Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्रत्येक वर्षी खड्डे भरण्याचा ठेका एकालाच, तरीही सर्वत्र खड्यांचे साम्राज्य

 

खड्डे भरणारा ठेकेदार महापालिका

प्रशासनाचा कोण लागतो ?

- माजी नगरसेवक मयुर पाटील                    

                 

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण डोंबिवली मनपाच्या ग्रामीण अ प्रभागातील रस्त्यात पडलेले खड्डे पाहता, रस्त्यात खड्डे की, खड्डेमय रस्ता अशी अवस्था झाली असून मोहने आंबिवली स्टेशन मार्गे बल्याणी रस्ता गाळेगाव मोहीली  बल्याणी रस्ता या रस्त्यावर खड्याचे साम्राज्य पसरले असल्याने वाहन चालकासह प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे. रस्त्यातील खड्डे समस्यामुळे संभाव्य जिवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा संतापजनक सवाल यानिमित्ताने होत आहे.           

     गणेशोत्सव सण सुरु होण्यापूर्वी अ प्रभागातील आंबिवली स्टेशन रोडमोहनेबल्याणीमोहिली परिसरातील खड्डे भरण्यात यावेत यासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयुर पाटील यांनी गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वीची महापालिका प्रशासनाला निवेदन दिले  होते. परंतु खड्डे भरणारा ठेकेदार प्रत्येक वर्षी तोच असतो तरीही रस्त्याच्या खड्डे भरले जात नाहीत. रस्त्यात खड्डे की खड्डेमय रस्ते अशी अवस्था झाली आहे. ठेकेदार महापालिकेचा कोण लागतो असा सवाल माजी नगरसेवक मयुर पाटील यांनी यानिमित्ताने महापालिका प्रशासनाला केला आहे.

   


परंतु गणेशोत्सव सुरू झाला तरी रस्त्यामधील खड्डे भरले नाही.  सर्वत्र रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे. याबाबत माजी नगरसेवक पाटील यांनी आंबिवली स्टेशन ते बल्याणीतसेच मोहनेमोहली बल्याणी रस्ताउंभर्णी रस्ता मार्गावर रस्त्याच्या मधोमध मोठं मोठे खड्डे पडले आहेत. महापालिका प्रशासन प्रत्येक वर्षी एकाच ठेकेदाराला ठेका देते तो ठेकेदार थुकपट्टी लावित काम करतो. संबंधित महापालिका अधिकारी फक्त एसी कॅबिनमध्ये बसतातप्रत्यक्षात कामाच्या जागेवर जात नाही हा तर खरा महापालिका प्रशासनाला शाप आहे.

तसेच अ प्रभाग ग्रामीण भाग असल्यामुळे महापालिका प्रशासन सावत्र भावाची वागणूक देत. असल्याचे दिसते. बल्याणी प्रभागात सर्वधर्मिय नागरीक राहत आहेत. विविध सण साजरे करतात परंतु रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यातूनच भाविकांना पायी जावे लागते. वाहनचालकशालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढवा असे पाटील यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments