ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहतीतील शांतीदूत सोसायटीचा पुनर्विकास करण्याचे काम एका विकासकाला दिले होते. अनेक वर्षापासून पुनर्विकास रखडल्या बिल्डर आणि त्याला मदत करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रहिवासियांसह पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात लवकरच बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिल्याने तूर्तास हे उपोषण आज सायंकाळी मागे घेण्यात आला आहे.
या उपोषणासंदर्भात भाजप आमदार किसन कथोरे आणि महेश चौगूले यांनी मुख्यंमत्र्यांना सगळी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लवकर बैठक लावण्यात येईल असे आशवासन दिले. याबाबतची माहिती आमदार कथोरे आणि चौगूले यांनी पवार यांना दिली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना देखील ही माहिती देण्यात आली आहे. ठोस आश्वासन मिळाल्याने उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षकांच्या बैठकीत आमचे समाधान झाले नाही तर पुन्हा उपोषण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पण मला पूर्ण विश्वास आहे की, मुख्यमंत्री हा प्रश्न सोडवतील. त्यांच्यावर विश्वास ठेवऊन आम्ही हे उपोषण तूर्तास स्थगित केले असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments