ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
वडवली भाजपा मोहने मंडळ अध्यक्ष नवनाथ बाळाराम पाटील यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.यावेळी त्याच्या वाढदिवसाचे अवचित साधून गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. अनाथ आश्रमात त्यांनी अन्नदान केले. हॉस्पिटल मध्ये फळं वाटप करण्यात आले. असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. नेहमीच प्रभागातील नागरिकांन साठी अनेक योजना, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, कोरोनात त्यांनी आपल्या कडून होईल ती मदत , रक्तदान शिबिर ,पावसाळ्यात नागरिकांची सोय करून त्याची राहण्याची आणि खाण्याची सोय, अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार, राजकीय,क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक,उद्योजक , बीजेपी कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज त्यांच्या याच कार्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी दिसून आली.यावरूनच कळते की त्याच्या वर नागरिकांचे किती प्रेम आहे.
Post a Comment
0 Comments