ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख
मेड इन इंडिया म्हणजे भारतातील मोलकरीण असा हा आजचा विषय आहे .एक मैत्रीण रडत रडत सांगायला लागली ,"मोलकरीण सोडून गेली."
तुम्ही म्हणाल हा काय विषय आहे ?हे काय लिहिणं झालं ?मोलकरीण सोडून गेली ,असा लेख कोणी लिहित का?पण मोलकरीण सोडून जाणं, हे किती त्रासदायक असतं ,हे जेष्ठ नागरिकांना बरोबर समजते.मोलकरणींनी गंगाबाईने[ काही घरी मोलकर्णींना गंगाबाई असंच म्हणायची पद्धत आहे आपण मावशी काकू बाई असं म्हणतो.]भराभरा हात चालवून लवकर काम संपवलं नाही, तर पुढे गाडी चुकणं ,ऑफिसला उशीर होणं वगैरे ची मालिका बनते. तो छळ नोकरदार महिलांना/सर्वाना/ऑफिसला देखील समजतो.
मला आठवत,"तब्येत बरी नाही एक महिना जरा स्वयंपाकाची बाई तुमची द्या ."असं सांगून एका बेबीबाईने आमची पोळ्या करणारी आणि भाजी कापायला मदत करणारी बाई पळवली.त्या कामवाली बाईला तिकडे आवडायला लागलं. तिने आमचं काम सोडून दिलं.त्या बेबीबाईंनी आमच्या आई बद्दल अभिबाईकडे खूप बडबड केली होती.ती बेबीबाई म्हणायची ," म्हाताऱ्या आईकडे कसं,फक्त काहीतरी मदत लागली ,तरच मी जाते. मजा करायला कोण आग विझवण्याच्या बंबाकडे जातात का ?मजा करायला भारी होंडा सिटी मध्ये जातं, तशी मी मजा करायला अन्य बाई बरोबर जाते. पण मदत हवी असली की त्या म्हातारी आजीकडे जाते. कारण आग विझवायची मन शांत करायची इतरांना चांगले सल्ला देण्याची आणि मदत करायची वृत्ती आहे."
असं म्हणणाऱ्या बाईला सुद्धा माझ्या आईने आमची मोलकरीण देऊन मदत केली. मला कधीकधी वाटतं आपल्याला ,आमच्या कुटुंबात, बरेच जणांना, चांगुलपणाचा आजार झाला आहे. जो आम्हाला सगळ्यांना घातक ठरतो.आमची ती मेड बाई सोडून गेल्यामुळे माझी नोकरी,वडिलांच आजरपण आईला काम व्हायचं नाही आईचं शुगर वाढायची.यात अधिक हाल झाले. म्हणजे खरं मोलकरीण देणे आम्हाला धोक्याचा ठरत होत.
दुसरी कामवाली बाई लावली. तिला माझ्या बहिणी माहेरी आल्या, पाहुणे आले, की राग येई. पूर्वीच्या काळी कायमच मुलींनी माहेरी येणे, भावानी सुट्टीला येणे ,काकांनी मामांनी येणं हे प्रकार असायचे. घरी पाहुणे यायचे.मंदिरात जाण्यासाठी आलेले लोक आमच्या घरीच हॉटेलचे पैसे वाचवण्यासाठी राहत असत.पाहुणे बहिणी त्यांची मुलं खेळते आणि वाढत्या वयाची होती. ती भरपूर पोळ्या खायची. तर त्या पोळ्यावलीला पोळ्या करायचं जीवावर यायचं .
ती मुद्दाम माझी ऑफिसला जायची वेळ संपल्यावर यायची. जेणे करून मी दोन पोळ्या माझ्या खायचे आणि दोन डब्याच्या अशा चार पोळ्या करून घेवुन जायचे .आपोआप कणिक मळणे हे तिचे काम पण होऊन जाई.मला घाई असायची. त्याकाळी काही ऑफिसमध्ये कॅन्टीन नसायचं आणि बाहेर जेवण पण मिळायचं नाही.अशी ती कामवाली चतुर लबाड होती. तिला बोलवायला गेले की ती बोलायची," तुमच्याकडे पाहुणे येतात.या पोरी माहेरीच पडलेले असतात. सुन तर कधी येतच नाही.सून मुंबईला मज्जा करते ईथे मुली पडलेल्या असतात."मला खूप राग येई.ते ऐकून आले की मी घरी आल्यावर आईची भांडायचे ."कशाला ही भिकारी बाई लावली आहे .सोडून द्या ..दुसरी बघ." .खरंतर मी आईला सहानुभूती दाखवायला हवी होती. की ,"आई अग मोलकरणी अशाच असतात .असू दे आणि दुसरी मुलगी कामाला बघ .एखादी बाई बघ ."
आमच्या मोठ्या वहिनी "ही तुमच्या घरीच राहील ही मुलगी हिला ठेवा आणि स्वयंपाक करेल ",असं म्हणून एक त्यांच्या नात्यातली बाई, नेहमी आमच्या घरी आणून द्यायच्या .पण ती बाई बरोबर वाटायची नाही. त्यामुळे आई त्यांना नको म्हणायची.त्यावर आमच्या वहिनी चिडचिड पण करायच्या ,"आहो काय दोन गोळे भर भाग खाईल, ती तुमच्या सेवेला होईल. राहू दे .राहू दे." पण आई त्याला तयार झाली नाही.
माझी मोठी बहीण तर नेहमी म्हणायची ,आपली मोलकरीण आणि मैत्रिण ,आपला डॉक्टर कोणाला सांगू नये.मैत्रिणी परस्पर एक होतात.मोलकरणी परस्पर पळवल्या जातात आणि डॉक्टरचं मत कलुषित केलं जातं.
मोलकरणींच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा मालकिणीच्या हातात सत्ता असते पैसा असतो ,अंगात जोर असतो ,तेव्हा या बायका धावून धावून काम करतात . जेव्हा व्यक्ती वयस्कर होते आजारी पडते ,तिच्या घरात पूर्वीसारखा पैसा येणं बंद होतं ,,निवृती येते,मदतीला येणारी माणसं कमी होतात, शरीरातील शक्ती कमी होते तेव्हा या मोलकरणी त्यांचे खरे रंग दाखवतात . भांडायला सुरुवात करतात .काम अर्ध करतात. हळव्या माणसाला याचा त्रास होतो.लबाड मालकिण बाई असेल तर, दोन द्या, दोन घ्या करून मोलकरणीला दम देत राहते. पण आमच्या घरी आम्हाला कोणालाच, ते समजलं नाही .
आमच्या मोठ्या मावस बहिणी मला नेहमी म्हणायच्या ."तुम्हाला नोकर वागवता येत नाही .लोक नोकराला पायरीवर ठेवावं.तुम्ही त्याला चहा देता. खायला देता.घरगुती बोलता. त्याला घरच्या खाजगी गोष्टी सांगता .तो नोकर स्वतःला ग्रेट समजायला लागतो."ते खरंच होतं .आम्हाला नाही नोकर वागवता येत .आम्ही माणुसकीने ,बरोबरीने वागवायला जातो आणि त्या बायकांच्या डोक्यावर मिरे वाटतात.आम्ही त्यांना तूप वाढतो ते नोकर बरोबरांसारखेच बघायला लागतात."
मेड इन इंडिया ,मोलकरीण, भारतीय मोलकरणी ही एक मोठी सिरीयल बनली आहे.घरोघरी मोलकरणींचे तेच प्रश्न असतात. आमच्याबरोबर एक विमला म्हणून मैत्रीण होती.तिने गावाहून मुल सांभाळापयला मोलकरीण आली होती .ती दुपारी या मुलांना खोलीत कोंडून, ड्रायव्हर बरोबर फिरायला जायची.मोलकरणीचे प्रश्न हे न संपणारे असंतात.आईचं अर्धा आयुष्य आमचं मोलकरणीच्या छळामुळे कमी झाले असेल. मोठा बंगला वाडी बाग असल्यामुळे हाताखाली भरपूर नोकर असत. तरी काही तसे मनापासून काम न करणारे होते.छोटे मुंगीचा दंश जास्ती त्रास देत असतो .तसं हाताखालच्या लोकांचे विचित्र वागणं माणसाला जास्तीत त्रास देत.चांगले नोकर आणि चांगल्या मोलकरणी या हिंदी चित्रपटात आणि मराठी मालिकात असतात.
बाकी मेड इन इंडिया हा एक मोठा प्रश्नच आहे.
**
Post a Comment
0 Comments