ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
के. वि. पेंढारकर महाविद्यालयावर नवीन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून सेव्ह पेंढारकर मंचामार्फत करण्यात आलेल्या मागणीला मिळाले यश मिळाले आहे.
पेंढारकर महाविद्यालयात प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेले डॉ. विजय नारखेडे यांच्यावर भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार तसेच इतर गंभीर अनियमिततेचे आरोप असल्याचे निदर्शनास आले होते. अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाचा कारभार पारदर्शक, निःपक्षपाती आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा राहील, याबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या होत्या. संस्थेच्या हितासाठी आणि न्याय्य प्रशासन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सेव्ह पेंढारकर मोहिमे मार्फत डॉ. नारखेडे यांच्या नियुक्तीचा पुनर्विचार करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती.
या मागणीची दखल घेत शिक्षण विभागाने डॉ. विजय नारखेडे यांना पेंढारकर महाविद्यालयातील प्रशासक पदावरून कमी करत त्यांच्या जागी डॉ. रोहिदास काळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही कार्यवाही पारदर्शक व चांगल्या शैक्षणिक व्यवस्थापनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरते. सेव्ह पेंढारकरच्या या यशस्वी प्रयत्नाबद्दल सर्व संबंधितांनी समाधान व्यक्त केले आहे.
Post a Comment
0 Comments