ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शना नुसार देशात हर घर तिरंगा मोहीम दरवर्षी प्रमाणे राबविण्यात येते. या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण चिटणीस संदीप क्षीरसागर व कल्याण ग्रामीण महिला उपाध्यक्ष सोनी क्षीरसागर यांच्या माध्यमातून पिसवली जिल्हा परिषद शाळा व अडवली जिल्हा परिषद शाळा मधील लहान मुलांना खाऊ व झेंडे वाटप करण्यात आले. यावेळी कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष आतिश चौधरी, महिला कल्याण ग्रामीण अध्यक्ष प्रगती भोईर, कल्याण ग्रामीण कोषाध्यक्ष नीलम भोईर, युवा मोर्चा अध्यक्ष विकी पारदे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लहान मुलांना झेंडे व खाऊ वाटप करण्यात आले आणि भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अडवली परिसरातील सोसायटी व दुकानान मध्ये झेंडे वाटप करण्यात आले. संदीप क्षीरसागर व सोनी क्षीरसागर यांच्या माध्यमातून अडीवली पिसवली मध्ये असे अनेक उपक्रम राबवण्यात येतात त्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानत शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments