ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
गेल्या अनेक वर्षांपासून काम रखडल्याने तसेच उद्घाटनानंतरही खड्डे पडल्याने चर्चेत राहिलेल्या कल्याण शीळ रोडवरील पलावापुलाचा वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकरच पुन्हा येणार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि दिपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य दहीकाला महोत्सवाचे आयोजन ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी केले असून याठिकाणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. तसेच तरुणाईसोबत हस्तांदोलन करत सेल्फी देखील काढल्या. यावेळी आमदार सचिन अहिर हे देखील उपस्थित होते.
तर महाराष्ट्राची परिस्थिती पाहता युतीबाबत दोन्ही भाऊ योग्य तो निर्णय घेतील. कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची बिकट अवस्था पाहता लवकरच कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तर जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे हे दरवर्षी जोरदार दहीहंडी पण करतात आणि इतर लढाई देखील जोरदार लढतात असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments