ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर
‘हर घर तिरंगा २०२५’ या उपक्रमाच्या औचित्याने आज अंबरनाथ नगरपरिषदेतर्फे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेल्या या रॅलीत नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.
रॅलीची सुरुवात नगरपरिषद मुख्यालयातून करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून जाताना सहभागी सदस्यांनी हातात तिरंगा घेऊन नागरिकांना राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे आवाहन केले. रॅलीदरम्यान देशभक्तिपर गीतांमुळे वातावरण देशभक्तीने भारून गेले.
मुख्याधिकारींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाचा उद्देश स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता. नागरिकांनी रॅलीचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करत देशभक्तीची भावना व्यक्त केली.
Post a Comment
0 Comments