ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
टिटवाळा आंबिवली दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. टिटवाळा आंबिवली दरम्यान गुरुवारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कसारा कडून मुंबईच्या दिशेकडे जाणर्या मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. या बिघाडामुळे कल्याणहून टिटवाळ्याकडे जाणारी रेल्वे सेवा अर्धा तास उशिराने धावत होती. तर टिटवाळ्याहून कल्याणकडे येणाऱ्या रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करत तब्बल दीड तासाने कल्याणहून दुसरे इंजिन पाठवून मालगाडी बाजूला करण्यात आली. यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. या मालगाडीच्या इंजिन बिघाडामुळे या रेल्वे मार्गावरील मेल एक्स्प्रेस, लोकल सेवेला उशीराला सामोरे जाण्याची वेळ आली. तर दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे दर्शनासाठी बाहेर पडलेल्या रेल्वे प्रवाशांना उशीरा झाल्याने त्यांची तारांबळ उडल्याने रिक्क्षा बसचा प्रवास करावा लागला.
Post a Comment
0 Comments