श्री गणेशोत्सवासाठी केडीएमसीची जय्यत तयारी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चा करून दीड दिवस मनोभावे भक्ति करून आज गणरायांना भक्तिभावात निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कल्याणच्या गणेश घाट तसेच इतर विसर्जनस्थळी गणेश भक्तांची गर्दी दिसून आली. कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत दीड दिवसांच्या 1 सार्वजनिक तर सुमारे 13 हजार 20 घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली असून, महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत श्री गणेशोत्सव काळात नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठिकठिकाणी हॅलोजन बसविण्यात आले असून जनरेटरची देखीप व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच टॉवर लाईटिंगची व्यवस्था करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमे-यांच्या नियंत्रणाखाली देखरेख केली जाणार आहे.
श्री गणेश मुर्तीच्या विर्सजनासाठी नैसर्गिक तलाव, खाडी, कृत्रिम तलाव उपलब्ध असून नागरीकांच्या सोयीसाठी "विसर्जन आपल्या दारी" ही संकल्पना देखील प्रत्येक प्रशासकीय प्रभागात राबविण्यात येणार आहे. तर या उत्सवासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत 121 अधिकारी, 667 कर्मचारी, 150 होमगार्ड तर 2 एसआरपीएफच्या प्लाटून तैनात करण्यात आल्या आहेत.
Post a Comment
0 Comments