Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्री गणेश मुर्तीचे विसर्जन कृत्रिम विसर्जन स्थळी करण्याचे केडीएमसीचे आवाहन

 

                      ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात घरोघरी प्रतिष्ठापना केलेल्या दीड दिवसांच्या श्री गणेश मुर्तीचे विसर्जन  महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावात   करुन श्री गणेश भक्तांनी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी केलेल्या आवाहनास  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 जल प्रदुषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार  ६ फुटापेक्षा कमी उंचीच्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन तलावात, कृत्रिम विसर्जन स्थळी करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी,महापालिकेच्या दहाही प्रभागात कृत्रिम तलावांची, कृत्रिम विसर्जन स्थळांची उभारणी केली आहे. त्याचप्रमाणे मोठया विसर्जन स्थळी, नैसर्गिक जलस्त्रोताच्या ठिकाणी देखील कृत्रिम विसर्जन स्थळाची सुविधा श्री गणेश भक्तांसाठी उपलब्ध‍ करुन दिली आहे. 

नागरिकांनी, श्री गणेश भक्तांनी महापालिकेने उपलब्ध केलेल्या या सुविधेचा लाभ घेऊन पर्यावरण रक्षणासाठी ,जलप्रदूषण रोखण्यासाठी आपला हातभार लावून महापालिकेत सहकार्य करावे  असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments