Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मा.आमदार गोटिराम पवारांच्या वाढदिवसा निमित्ताने जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान!

                    ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड-प्रतिनिधी

 मुरबाड तालुक्यात स्पर्धा परीक्षामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढते त्याचबरोबर त्याचे पुढील शिक्षण सोयीस्कर होते असे प्रतिपादन मुरबाडचे लोकनेते माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ९जुलै २०२५रोजी शिवळे येथील सुभाष पवार जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात केले. यावेळी  उच्च शैक्षणिक तसेच इयत्ता उत्तीर्ण बारावी मध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, क्रिकेट क्रमांक, तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेल्या शाळांचा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला त्यामध्ये उच्च शैक्षणिक म्हणून डॉ. अनिता तुपे (पीएचडी), डॉ. विकास झुंजारराव (एचडी), डॉ. श्याम केदार (एचडी), डॉ. प्रज्ञा पवार (एमबीबीएस), ऋजुता पवार (एमबीबीएस), डॉ.प्रियंका संजय बोरगे(एमबीबीएस) कोरावळे जिल्हा परिषद शाळा शिष्यवृत्ती प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद शाळा मुरबाड शिष्यवृत्ती प्रथम क्रमांक, तसेच निखिल मुरबाडे,इयत्ता दहावी (सीबीएस )  यांच्यासह जवळपास २६२ विविध प्रकारांच्या विद्यार्थ्यांना वरील  मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.



यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार , रामभाऊ दळवी, जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ता भावार्थे,  खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार, प्रा.धनाजी दळवी ,पांडुरंग कोर ,लोकमित्र रमेश हिंदुराव,जनसेवा शिक्षण मंडळाचे चिटणीस भास्कर हरड, कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष गणपत विशे,मा.अध्यक्ष शांताराम बांगर,  प्रा.बी.एम.पवार, विनोदशेठ नार्वेकर, मोहन भावार्थे, अनंता पवार, पंचायत समिती मा.सदस्या योगिता विशे, अरूणा खाकर,महिला संघटक सौ.रेखा इसामे, तसेच जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, व सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन,सेक्रेटरी यांच्यासह मोठ्या संख्येने त्यांचे चाहते उपस्थित राहून लोकनेते माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांना शुभेच्छा दिल्या.

ह्या मंगलप्रसंगी श्री गोटीराम पवार यांनी  प्रसारमाध्यमांशी बोलतांना  सांगितले की, "मुरबाड मतदार संघातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांना सन्मानित करतांना आपल्या परिसरातील विद्यार्थी स्वतःच्या हिमतीवर राज्यात आणि देशात नाव कमावतो तेव्हा अतिशय अभिमान वाटतो. आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते....माझ्या तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेऊन प्रगती करत आहे.कोणी सैन्यात भरती होतोय,कोणी वरिष्ठ अधिकारी बनतोय हे पाहून अतिशय समाधान वाटते.त्यासाठीच मुरबाड मध्ये जन सेवा शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.आजवर अनेक विद्यार्थ्यांनी हा शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन यशस्वी झाले आहेत."

तालुक्यातील विकासंदर्भात बोलतांना त्यांनी खंत व्यक्त केली.तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या ,भूमिपुत्रांच्या व्यथेकडेही लक्ष वेधले.मुरबाडचे शहरीकरण मोठ्या झपाट्याने होत आहे.त्या नुसार वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी प्राथमिक सोयी सुविधांची वानवा असल्याचेही नमूद केले.मुंबई साठी अनेक गावांमध्ये धरणे बांधली जातात,परंतु तेथील शेतकरी भूमिपुत्र मात्र तहानलेलाच राहतो.राज्यकर्त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.मात्र तसे घडताना दिसत नाही ,ही खंत त्यांनी व्यक्त केली.





Post a Comment

0 Comments