Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

" केमिस्ट असोसिएशन मार्फत मुदत बाह्य व न वापरलेल्या औषधांचे होणार संकलन " -मा. श्री जगन्नाथ अप्पा शिंदे

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 10 जुलै 2025 रोजी, कल्याण येथे अखिल भारतीय तसेच महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या हस्ते ' पर्यावरण वाचवूया - औषधांचा गैरवापर टाळूया !' या संकल्पनेतून, मुदत बाह्य, उरलेली व न वापरलेली औषधांचे संकलन व त्याचे शास्त्रीय विल्हेवाट लावणे करिता टेकबॅक या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला

केंद्र सरकारच्या स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सेंट्रल ट्रक स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन द्वारे नुकतेच मे 2025 मध्ये सर्व राज्यांच्या औषध नियंत्रकांना एक्सपायर तसेच न वापरलेल्या औषधांचे शास्त्रीय विल्हेवाट लावण्याकरिता चे परिपत्रक आणि विस्तृत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था ,,महानगरपालिका यांच्यासोबत केमिस्ट असोसिएशनच्या सहभागातून पर्यावरणाला तसेच समाज आरोग्याला घातक ठरणाऱ्या एक्सपायर व शिल्लक औषधींच्या शास्त्रीय विल्हेवाट करणे विषयीच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन हे प्रत्येक केमिस्ट सभासदाकडे ग्रीन ड्रॉप बॉक्सची सोय ग्राहकांकरता करणार असल्याचे श्री जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.

सरकारच्या या भूमिकेचे स्वागत करताना त्यांनी हे देखील नमूद केले की सदर मुदत बाह्य औषधांचे संकलन कार्यक्रम गेल्या वर्षीच म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये राज्य संघटनेने आपल्या पश्चिम महाराष्ट्र झोन मधून कोल्हापूर व आसपासच्या भागात पहिल्या टप्प्यात सुरू केलेला आहे. त्यानंतर आता याची राज्यभर व्याप्ती वाढवत ठाणे जिल्ह्यातून केमिस्टचा सक्रिय सहभाग व महानगरपालिकांच्या बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट टीम बरोबर संयुक्त प्रकल्प राबवला जाणार आहे.

 मुदतबाहय किंवा न वापरण्याऱ्या अयोग्य असे औषध कचऱ्यात, गटारीत वा रस्त्यावर फेकली जात आहेत. अशा औषधामुळे प्रदूषणाला हातभार लागत आहे. हे प्रदुषण टाळण्यासाठी अशी औषधे कचऱ्यात न टाकता परिसरातील केमिस्टकडे आणून द्या. प्रदूषण टाळण्यासाठी, त्याची बायो वेस्ट या यंत्रणेमार्फत   केमिस्ट असोसिएशनमार्फत विल्हेवाट लावली जाणार आहे. अशी माहीती त्यांनी यावेळी दिली.

कल्याण शहरात  सुमारे 800 व ठाणे जिल्ह्यात जवळपास 5000 औषध मेडिकल दुकाने आहेत. या प्रत्येक मेडिकल दुकानांमध्ये एक ग्रीन ड्रॉप बॉक्स देऊन येणाऱ्या ग्राहकांकडून मुदतबाह्य औषधांचे संकलन करण्याचा संकल्प असोसिएशनने गुरुपौर्णिमेचे  औचित्य साधून केला आहे. मुदतबाह्य औषधामुळे प्रदूषण होऊन, मानवी आरोग्याला धोका निर्माण होत आहे. प्रत्येक मेडिकलमध्ये मुदतबाह्य औषध साठवणुकीसाठीची सोय केली आहे. 

सदर कार्यक्रमाला ठाणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री देशमुख- सचिव व पदाधिकारी तसेच अनेक प्रकारच्या माध्यमांतून ग्राहकांची जनजागृती करणाऱ्या प्राध्यापिका मंजिरी घरत यादेखील उपस्थित होत्या. तालुका अध्यक्ष सागर कुलकर्णी,सचिव विरेंद्र सिंग,कोषाध्यक्ष गणेश शेळके.माजी अध्यक्ष विनय खटाव, इतर पदाधिकारी...तनवीर शेख,महेंद्र राजपूत,शाम इंदोरिया,विलास पवार, राजेन्द्र खैरे..इत्यादी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments