ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
-जिल्हा परिषद ठाणे व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिनाचे औचित्य साधून “कृषिदिन व शेतकरी सत्कार समारंभ” दि. 1 जुलै, 2025 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
"केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता, शेतकऱ्यांनी जोडधंद्यांवर भर देणे काळाची गरज आहे. शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यांसारखे पूरक व्यवसाय अवलंबल्यास आर्थिक स्थैर्य मिळते. उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवकल्पना, सेंद्रिय शेती, ठिंबक सिंचन यासारख्या पद्धती अंगीकारा. शेती हा व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज आहे. शेतकरी सक्षम झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल," असे मार्गदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटिल, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप माने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर,पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किर्ती डोईजोडे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, लेखाधिकारी (२) रंविद्र सपकाळे, तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. जिल्हा कृषी अधिक्षक रामेश्वर पाचे यांनी प्रस्तावना सादर केली. यावेळी कृषी विभागाच्या विविध उपक्रमांवर आधारित घडी पत्रिका व पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील प्रगतशील ३६ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध कृषी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी माहितीपूर्ण सत्र घेतली. यामध्ये उदय देवळणकर (कृषी तज्ज्ञ), काशिनाथ गुणाखे (कृषीपूरक उद्योग), संजय कदम (उत्पादक कंपन्यांचे व्यवस्थापन), उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. वल्लभ जोशी (शेती व दुग्धव्यवसाय) यांनी आपले मार्गदर्शन दिले.
शेतकऱ्यांच्या मनोगतात गुरुनाथ सांबरे (कळवा), रामचंद्र आंबो पाटील (भिवंडी), आणि गजानन बापू उपसणे (शाहपूर) यांनी आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तरूलता धानके यांनी तर आभार प्रदर्शन कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले.
000
Post a Comment
0 Comments