ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
दरवर्षी पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीच्या कालावधीत मल वाहिन्या चोकअप होवून, रस्त्या-रस्त्यावर पाणी तुंबल्याचे दिसून येते. यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत: मल वाहिन्यांच्या स्वच्छता प्रक्रियेची पाहणी केली.
महापालिकेच्या मलनि:सारण विभागाच्या अंतर्गत मल वाहिन्या व त्यावरील चेंबर्स यामधील गाळ काढणे.तसेच चोकअप तक्रारींचे निराकरण करण्याकरीता शासनाकडून प्राप्त झालेली 18 टनाची 1 सक्शन व जेटींग ॲन्ड रिसायकल मशीन आणि मे.एकॉर्ड वॉटर टेक या एजन्सीमार्फत कार्यरत असलेली 31 टनाची 1 सक्शन व जेटींग ॲन्ड रिसायकल मशीन अशा एकुण 2 सक्शन व जेटींग ॲन्ड रिसायकल मशीन्स महापालिकेकडे कार्यरत असून, या मशीन्समार्फत कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रोड, एकविरा नगर आणि डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर परिसर या ठिकाणी सुरु असलेल्या चोकअप तक्रार निवारण कामाची प्रत्यक्ष पहाणी केली. तसेच यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या अडचणी देखील समजून घेतल्या.
यावेळी महापालिकेतील यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण पवार, जनि:मनि: विभागातील उपअभियंता व इतर कर्मचारी वर्ग तसेच मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments