ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
डोंबिवली - कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पलावा पुल शुक्रवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला झाला आणि काही वेळेतच वाहनांसाठी बंद करण्यात आला.
कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे, जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी हा पूल घाईघाईने सुरू करत विरोधकांवर टिका केली,खरी परंतु सर पुलावरून वाहतूक सुरूही झाली,आणि लागोपाठ दोन तीन दुचाकीस्वाराचे घसरून अपघातही सुरू झाले.
प्रशासनाने आणि सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी अत्यंत घाईने सदर पुलाचे उद्घाटन केले.परंतु पुलाच्या बांधकामात अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट दिसून आले.आणि अपघातांना सुरुवात झाल्यावर सकाळी जाहीर उद्घाटन केलेल्या पुलाला त्वरित काही दिवसांसाठी बंद करण्यात आले.मात्र पुलाचे काम शिल्लक असल्याने पुन्हा हा पूल बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
विरोधकांनाही ह्या प्रसंगी चांगलीच संधी मिळाली टीका करण्याची.निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेला हा पूल लवकरात लवकर योग्य पद्धतीने त्याचे काम व्हावे अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी श्री.राहुल भगत, परेश पाटील,आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी माध्यमांसमोर केली आहे.कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सदर पुलाचे बांधकाम करणाऱ्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारण्यात यावा.आणि अशा प्रकारचे निकृष्ट काम करणाऱ्यांना कळ्या यादीत टाकावे.अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.
कल्याण शीळ रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग असून या मार्गावर वाहनांची वर्दळ जास्त असल्याने वाहन कोंडीची समस्या निर्माण होते. पलावा जंक्शन हे तर वाहतूक कोंडीचे केंद्र मानले जात होते. पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देसाई खाडी ते काटई चौक अशा दोन पुलांची उभारणी करण्यात येत आहे.2018 सालापासून एकाच बाजूच्या पुलाचे काम आज पर्यंत सुरू होते..इतका मोठा कालावधी का लागला.आणि सदर प्रकरणात बांधकामाच्या करारातील अटी शर्थींच्या नियमांप्रमाणेच पुलाचे काम होणे अपेक्षित होते. परंतू संबंधित प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि कंत्राटदाराचा निष्काळजीपणा अशा निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात दिसून आला आहे.
Post a Comment
0 Comments