दिनांक 05 जुलै 2025 शनिवार रोजी म्हणजेच आषाढी एकादशीच्या पूर्वसध्येला ठाणे जिल्ह्यातील म्हस्कळ या ठिकाणी असलेल्या जीवन संवर्धन या अनाथआश्रमात जाणता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या एनजीओमार्फत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न झाले .
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अनाथाश्रमातील मुलांकरिता आरोग्य तपासणी व औषधोपचार अशा मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांचे आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत वैद्यकीय मदत वऔषधोपचार करण्यात आले.
आजची मुले ही उद्याच्या राष्ट्राचे भविष्य आहे हे जाणूनच गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही जीवन संवर्धन अनाथ आश्रमातील मुलांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना योग्य औषधोपचार मिळावा यासाठी जाणता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या एन जी ओ मार्फत विनामूल्य सेवा पुरवण्यात आली.
याप्रसंगी जाणता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभाकर ताम्हणकर, महिला अध्यक्ष ललिता मोरे ,आरोग्य शिबिराची जबाबदारी घेणारे जाणता प्रतिष्ठानचे सचिव राम चौहान, आणि डॉक्टर शोभा पाटील त्यांच्यासोबत स्नेहा अय्यर तसेच शिबिराचा कार्यभार सांभाळणारे रोहित महाले,सर्व मुलांना हसत खेळवत आनंदमय वातावरण निर्मिती करणारे गणेश टीकम इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते.
या आश्रमातील मुलांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी आश्रमाचे विश्वस्त नंदन कुलकर्णी ,श्रीपाद कुलकर्णी, आणि त्यांचे सर्व सहकारी यांनीही विशेष मेहनत घेत आरोग्य शिबीर संपन्न करण्यास मोलाचे सहकार्य केले.
Post a Comment
0 Comments