दोन जण जखमी, मोठा अनर्थ टळला
घरातील सामान जळून खाक
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रोड परिसरात एका चाळीतील घराला आग लागल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. दैव बलवत्तर सुदैवाने जिवितहानी टळली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रोड परिसरातील चाळीतील घराला सोमवारी संध्याकाळी चार साडेच्या चार सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील सामान जळून खाक झाले. तर दोन जण जखमी झाले असून त्यांना उपाचार्थ तातडीने रूग्णालयात नेले. घटनास्थळी तातडीने कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या बंबाने पोहचत अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून आग विझवली. दरम्यान घरात आग लागली तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी घरातून सिलेंडर बाहेर काढले.
या आगीत दोन जण किरकोळ जखमी असल्याची माहिती फायर ब्रिगेडचे अग्निशमन केंद्र प्रमुख अधिकारी विनयाक लोखंडे यांनी दिली आहे. नेमकी आग कशाने लागली हे समजले नसून या घटनेत घरातील सामान जळून खाक झाल्याने 3लाख रू मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे घर मालकाचे म्हणणे असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments