ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
केडीएमसीच्या शाळा क्रं 19मधील तीन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने 38 मुख्याध्यापकांना काही दिवसांपूर्वी दिलेल्या कारणे दाखवा नोटीस नंतर तीन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस दिल्याने शिक्षक देखील रडावर आले असल्याचे दिसत आहे.
कल्याण डोंबिवली शिक्षण विभागाच्या मनपाच्या 61 शाळांपैकी सुमारे 38 मुख्याध्यापकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीसा काही दिवसांपूर्वी बजावल्या होत्या. नुकतेच नेतवली येथील मनपा शाळा क्रं 19 प्रबोधनकार ठाकरे शाळेतील तीन शिक्षकांना मासिक अभ्यासक्रम विघार्थी चाचणी अंतर्गत काही विद्यार्थ्यामध्ये प्रगती न आढळल्याचा ठपका ठेवत शिक्षण विभाग उप आयुक्त यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने कामचुकार कर्तव्यात कुसूर करणार्या शिक्षकांची देखील आता खैर नसल्याचे दिसत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग उपआयुक्त यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना शाळांची पालकत्व जबाबदारी देत शाळातील शिक्षण दर्जा सह सोयी सुविधा आढावा घेत त्या मार्गी लावण्यासाठी वाँच आहे. नुकताच प्रबोधनकार ठाकरे शाळेचा पाहणी दौरा आयुक्तांनी केला. 1ली ते 8 वी पर्यंत सुमारे 450 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या या शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यान शैक्षणिक धडे बरोबर देण्यासंदर्भात धारेवर धरले होते. एकंदरीत पाहता मनपा शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक दर्जा गुणवत्ता,सोयी सुविधा बाबत प्रशासनाने दक्ष भुमिका घेतल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.
Post a Comment
0 Comments