ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
डोंबिवलीतील मानपाडा रोड येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या परिसरात बहुप्रतिक्षित "छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीसह बैठकरूपी पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य असा अनावरण सोहळा" गुरुवारी संपन्न झाला. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते हे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात पोवाडा गायन, देशभक्तिपर गीतसंगीत, शौर्यप्रदर्शन तसेच पारंपरिक ढोल-ताशा वादन यांचा समावेश होता.
या वेळी सुप्रसिद्ध गायक अभिजित जाधव आणि आमु जाधव यांनी संयुक्त सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचे सादरीकरण कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सर्व डोंबिवलीवासियांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, सुलभा गायकवाड, शिवसेना आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. श्रीकांत शिंदे _ "सांस्कृतिक नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या नुतनीकरणाचे लोर्कापण झाले आहे. याठिकाणी 1976 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धीकृती पुतळा काही दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन बसविला होता. मेघडंबरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार राज्यसरकार आणि महापालिकेच्या निधीतून हा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वरूढ असा छत्रपतीचा पुतळा बसविण्यात आला होता. कल्याण डोंबिवलीत कॉक्रीटीकरणाचे रस्ते, मेट्रो, कल्याण शीळ रोड, लोकोपयोगी वस्तू उभ्या राहत आहे. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याठिकाणी बसविण्यात आला आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार व्यक्त केले."
रविंद्र चव्हाण _डोंबिवली शहर ही शिवभक्तांची नगरी - "हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिशादर्शक आणि प्रेरणादायी विचारांचे संस्कार आपल्या डोंबिवली शहराच्या मातीतच आहेत. येथील आबालवृध्द डोंबिवलीकर हे शिवभक्त असून शिवछत्रपतींच्या हिंदवी शिकवणीतून हिंदू संस्कृती आणि परांपरांचे जतन व संवर्धन करण्यात कायमच अग्रेसर राहिले आहेत, अशा शिवभक्त नगरीचा लोकप्रतिनिधी असल्याचा सार्थ अभिमान आहे असे मत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले."
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बैठक पुर्णाकृती पुतळयाची उंची १.२० मी. (४ फुट) असून मेघडंबरीची उंची ३.२० मी. (१० फुट ६ इंच) १.७६० मी. (५ फुट ९ इंच) इतकी आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे वजन ६२५ किलो असून मेघडंबरीचे वजन १२५० किलो असे एकूण वजन १८७५ किलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेघडंबरीसह पूर्णाकृती बैठक पुतळा उभारणे कामाची अंमलबजावणी महापालिकेमार्फत करण्यात आली असून या कामाच्या सुशोभिकरणाच्या अंतर्गत डेकोरेटीव संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. भिंतीस स्टोन क्लॅडींग व लोखंडी नक्षीदार ग्रिलचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पुतळयाच्या करिता पेडेस्टल बांधण्यात आले असून डेकोरेटीव स्टोन फ्लोरिंगचा समावेश करण्यात आला आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments