Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुरबाड वन परीक्षेत्र पश्चिम आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती ब्राह्मणगाव व किशोर यांचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

 

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

आज दिनांक 5 जून 2025 रोजी जागतिक वन दिनानिमित्ताने मुरबाड पश्चिम वन क्षेत्रातील किशोर परिमंडळ मधील मौजे ब्राह्मणगाव राखीव वन. क. न. 786 मध्ये मुरबाड वन परीक्षेत्र पश्चिम आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती ब्राह्मणगाव व किशोर यांचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रसंगी स्थानिक समाज सेवक श्री मोहन शेट्टी यांचे हस्ते पिंपळ वृक्ष लावून कार्यक्रमचा शुभारंभ करण्यात आला..... तसेच या कार्यक्रम मध्ये नागरिकांनी सामील होऊन वृक्षारोपण कार्यक्रम मध्ये जास्तीत जास्त झाडे लावली..... या परिसरात जांभूळ, आवळा, पिंपळ, करंज, इ. प्रकारची रोपे लागवड करण्यात आली. या ठिकाणी उपस्थित सर्व गावकरी,सवस समिती अध्यक्ष,समाजसेवक, वन कर्मचारी वर्गाचे श्री प्रसाद मरले सर वनक्षेत्रपाल मुरबाड पश्चिम यांनी आभार मानले.

तसेच या प्रसंगी उपस्थित असलेले सवस समिती किशोर श्री वसंत गायकर यांनी देखील वृक्षाचे महत्व विषद करताना प्रबोधन पर भाषण केले.या ठिकाणी सवस समिती ब्राह्मणगाव अध्यक्ष श्री दत्तू घुटे ग्रुप ग्रामपंचायत धानिवली, ब्राह्मणगाव चे सरपंच श्री पांडुरंग झुगरे,तसेच समाजसेवक श्री छगन बनकरी, वनपाल श्री साहेबराव खरे, वनपाल श्री चव्हाण, वनरक्षक सर्वश्री विनायक पवार, राजेंद्र खाडये, सागर इरोळे, रोशन पावशे, घोलप, सूरज माटोळे, देशमुख, महिला वनरक्षक प्रतिलता फड, वाहन चालक धर्मा खुणे,सोबत वन मजूर श्री बाबू निरगुडा, जयराम पारधी, जगन शिद नरेश भावार्थे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments