Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण जिल्हा कारागृह वर्ग १, कल्याण आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (नेफडो) कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा

 

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण प्रतिनिधी

 ५ जून २०२५ जागतिक पर्यावरण दिवस या दिवसाचे औचित्य साधून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था महाराष्ट्र ठाणे जिल्हा उपाध्यक्षा अनिता कळसकर व श्री. पी.जे.जगताप अधीक्षक, कल्याण जिल्हा कारागृह वर्ग - 1, कल्याण, जिल्हा ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने कल्याण जिल्हा कारागृहातील परिसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रोपे आणून सहकार्य केले  व आवर्जून हजेरी लावली. सदर कार्यक्रमासाठी अनिता कळसकर व इतर सदस्यांनी चिंच,रीठा, आपटा, सावर आणि कडूनिंब व इतर झाडे आधारवाडी कारागृह परिसरात लावण्यास मदत केली. कारागृहाचे अधीक्षक श्री. प्रदीप जगताप, उपअधीक्षक श्री.यु पी पाटील व सीनियर जेलर श्री.अभिजीत कोळी यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले, तसेच कारागृहातील डॉक्टर मंगेश जाधव व इतर महिला कॉन्स्टेबल यांना तुळशीचे रोपं देऊन सन्मानित करण्यात आले.


 याप्रसंगी नेफडोचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.प्रकाश कदम सर तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अस्मिता सावंत, राष्ट्रीय महिला सचिव आसिया मॅडम ,ठाणे जिल्हा सचिव मिरा भेंडिगीरे,मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ज्योती चोरगे, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय निरभवणे, अंबरनाथ तालुका अध्यक्षा पूजा जाधव, अंबरनाथ तालुका सचिव, शशिकला  दुरुगडे, अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष, सावित्री बिरंजे, अंबरनाथ तालुका उपसचिव, तसेच अंबरनाथ तालुका अध्यक्ष कल्पना झेंडे, प्रणिता भंडारवार तसेच बहिणाई ट्रस्टचे अध्यक्ष, पत्रकार व समाजसेवक श्री.सुनिल इंगळे इ.सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून उपक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. यावेळी सौ.अनिता कळसकर ठाणे जिल्हा उपाध्यक्षा यांनी आलेल्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.अगदी खेळीमेळीच्या व अत्यंत उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. 

विशेष म्हणजे आज झालेल्या वृक्षारोपणाची आणि अगोदर असलेल्या वृक्षांची सर्वतोपरी निगा राखण्याची जबाबदारी आमचे कारागृह प्रशासन घेणार असे आश्वासन कारागृह अधीक्षक श्री.प्रदीप जगताप साहेब यांनी दिले वृक्षारोपणांस सहकार्य करण्यास सर्व कारागृह प्रशासनातील मान्यवरांचे  सहकार्य लाभले. संपूर्ण नेफडोच्या पदाधिकारी आणि आधारवाडी कारागृह, कल्याण पश्चिम येथील सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचे  आयोजन करणाऱ्या अनिता प्रविण कळसकर ठाणे जिल्हा उपाध्यक्षा यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रम अतिशय उत्साहाने व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments