ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
ठाण्यातील प्रथितयश लेखिका शुभांगी पासेबंद यांच्या 'झपूर्झा' या ४९ व्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते ठाणे येथे झाले. पुणे येथील पार्थ प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 'झपूर्झा' या पुस्तकात १८ लघु कथा आहेत.
यावेळी बोलताना श्री. भुजबळ यांनी शुभांगी पासेबंद यांनी बँकेतील अधिकारी पदाची जबाबदारीची नोकरी सांभाळत आणि आता निवृत्तीनंतरही त्या जी साहित्य सेवा करीत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी न थांबता पुस्तकाचे अर्ध शतक आणि पुढे शतक पूर्ण करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
लेखिका शुभांगी पासेबंद यांनी बँकेतील नोकरी सांभाळत लेखन करणे म्हणजे तारेवरची कसरत होती, असे सांगून त्यांच्या साहित्य निर्मितीतील विविध टप्पे विषद केले. यावेळी आरोग्य संवादक अलका भुजबळ, लेखिका मीना घोडविंदे याही उपस्थित होत्या.
.jpg)

Post a Comment
0 Comments