Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

दुर्गाडी किल्ल्याचे प्रकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचा चेंडू पुरातत्व विभागाच्या कोर्टात

    

                      ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याणातील इतिहास कालीन दुर्गाडी किल्याची संरक्षक भिंत बुधवारी पहाटे झालेल्या पावसात कोसळल्याची घटना घडली.  या पुरातन ऐतिहासिक ठेव्याची जबाबदारी आपल्या अंगावरून झटकण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभाग यांची जुपंली असल्याचे यानिमित्ताने समोर आले असून शासन अंग असलेल्या दोन्ही विभागाची  टोलावा टोली पाहता, जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमारांची मुहूर्तमेढ कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे रोवली. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ले दुर्गाडी हे लाखो शिवभक्तांचे श्रद्धा स्थान असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करोडो रू. खर्च करून किल्याची डागडुजी तसेच बुरूजाचे काम, कमानी चे काम सुरू आहे. अशातच किल्ल्याच्या समोरील बाजूस असलेली संरक्षक भिंत अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात बुधवारी पहाटे कोसळली. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिकार्यांना ठेकेदारा हलगर्जीपणा बाबत खडे बोल सुनावित धारेवर धरले.  

तर  गुरुवारी  खासदार सुरेश म्हात्रे यांनी  दुर्गाडी किल्याच्या भिंतच्या ढासळलेल्या  भागाची पाहणी करीत ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. काळ्या यादीत टाकावे असेही म्हणाले.   या घटनेत पुरातन ऐतिहासिक ठेव्याच्या जबाबदारी आपल्या अंगावरून झटकण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभाग यांची जुपंली असल्याचे दिसून आले असतानाच, सार्वजनिक बांधकाम विभागाने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी उपविभाग कल्याण यांना पत्र दिले आहे.

या पत्रात कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याच्या भोवती बांधण्यात आलेली संरक्षण भिंत कोसळल्या बाबत संरक्षण भिंतीचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन करण्यात आलेले नाही. सदरचे काम हे पुरातत्व विभागा कडुन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या कोसळलेल्या संरक्षण भितीबाबत या विभागाकडुन कोणतीही कार्यवाही होणे क्रमप्राप्त होत नाही. हे आपल्या माहितीसाठी व पुढील उचित कार्यवाहीस्तव सविनय सादर. अशा आशायाचे पत्र उपविभागीय अधिकारी सा. बां, उपविभाग क्रं 1कल्याण यांनी दिले असल्याने पुरातत्व विभागाकडे किल्ले दुर्गाडी भिंत कोसळल्याच्या घटना प्रकरण वळले असल्याचे दिसून येत आहे.


Post a Comment

0 Comments