ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हणजेच दि. 21 जून रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, आर्ट ऑफ लिव्हींग आणि एसकेडीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत, कल्याण स्थानका नजीकच्या कै.दिलीप कपोते वाहन तळावरील सहाव्या मजल्यावरील मोकळ्या जागेत या योग दिन शिबीराचे आयोजन सकाळी ७ ते ८ या वेळेत करण्यात आले असून, या दिवशी महापालिका अधिकारी, कर्मचारी वर्ग योगाभ्यासाचा लाभ घेणार आहेत.
आर्ट ऑफ लिव्हींगचे जेष्ठ, अनुभवी प्रशिक्षक उपस्थितांना योगाभ्यासाचे प्रशिक्षण देणार असून, यावेळी उपस्थितांसाठी स्नॅक्स व जलपानाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली आहे. या योग शिबीराचा सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments