Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पश्चिमेतील ग्राऊन्ड प्लस वन इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील स्लाप कोसळल्याची घटना संतोषी माता रोड नजीक राऊत चाळ परिसरात घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.                       

केडीएमसी सहाय्यक आयुक्त क प्रभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोड जवळ राऊत चाळ परिसरात सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास राजू बारी यांच्या मालकीच्या ग्राउंड  प्लस वन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लप पहिल्या मजल्यावर कोसळला. या इमारतीत चार कुटुंबे राहत होती. दुसर्या मजल्यावरील कोसळलेल्या स्लप मध्ये कोणीही राहत नव्हते.  सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.




 घटनास्थळी क प्रभागक्षेत्र अधिकारी कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी पोहचत कोसळलेल्या स्लपचा भाग काढून टाकला. या  इमारतीत राहणाऱ्या चारही कुंटुबाने सुरक्षित ठिकाणी स्थालातंर केले असून इमारत मालकास  इमारतीचे तातडीने स्टक्चर अँडिट करून घेण्याबाबत नोटीस दिली असल्याचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments