ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवली स्टेशन परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षा तर्फे फेरीवाल्यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.फेरीवाल्यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या जवळचा १५० मीटरचा परिसर हा फेरीवाला मुक्त असायला हवा. परंतु डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरात न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे. न्यायालयाचा अवमान केडीएमसी प्रशासन आणि फेरीवाले उघडपणे करत आहेत.डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाले राजरोसपणे फुटपाथ अडवून रस्ता अडवून आपला व्यवसाय करतात.
आंदोलनकर्ते श्री.अभिजीत सावंत यांनी सांगितले की," व्यवसाय करण्याला आमचा विरोध नाही. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार जी १५० मीटरची सीमा रेषा आखून दिली आहे त्या ठिकाणी व्यवसाय करावा ही आमची मागणी आहे. स्टेशन परिसरात अफाट गर्दी होत असल्यामुळे स्टेशनवर जाण्या-येणाऱ्या सर्व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो."
फेरीवाल्यांकडून अनेक वेळा महापालिका कर्मचारी/नागरिक यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.त्याच अनुषंगाने काही दिवसापूर्वी नोबल हॉस्पिटल मध्ये निघालेल्या अँम्बुलन्समुळे धक्का लागला असता ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली. फेरीवाले कोणालाच जुमानत नसल्याचे दिसून येते.
असे असले तरी महापालिका प्रशासनाने या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काही ठोस धोरण ठरवणे गरजेचे आहे. परंतु तसे काही होतांना दिसत नाही. महापालिकाचे संबंधित अधिकारी,पोलिस प्रशासन,या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाही, जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एप्रिल महिन्याच्या १७ तारखेला उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळेस ग प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि फ प्रभाग क्षेत्र अधिकारी या दोघांनीही मला चर्चेसाठी आमंत्रित करून या पुनर्रचनेसाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागेल तोपर्यंत आपण उपोषणाला बसू नये अशी विनंती केली होती. सन्माननीय अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमचे उपोषण पुढे ढकलले होते. पण त्यानंतर ही महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही/कारवाई करण्यात आलेली दिसत नाही. या सुस्त प्रशासनाच्या विरोधात आणि कल्याण डोंबिवली मधील डोंबिवली मधील नागरिकांना स्टेशन परिसरात फेरीवाला मुक्त परिसर व्हावा याकरिता उपोषणाला सुरुवात केली आहे.
आंदोलनकर्ते....अभिजित सावंत
.jpg)



Post a Comment
0 Comments