ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मुरबाड मधील शांताई निसर्ग पर्यटन केंद्र, शेलारी म्हाडस येथे समृद्धीच्या वाटा हा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद शिक्षक, लेखक, समाजसेवक अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या योगेंद्र बांगर यांनी प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले. गाव-खेडे व आदिवासी, कातकरी कुटुंबातील आज्जींना एकत्र करून आणि शिस्त म्हणून गुलाबी रंगाची साडी चोळी असा सुंदर पेहराव करण्यास सांगुन प्रौढशिक्षण वर्ग सुरू केले. त्यांना वाचनाची गोडी लावली लेखन शिकवले तसेच समस्त गावकरी, कातकरी कुटुंब बचतगट, दिव्यांग अशा समाज घटकांना लघुउद्योग चे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी मुंबई बाळासाहेब खांडेकर, शिक्षणाधिकारी (योजना) भावना राजभोर, मुरबाड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्यांची पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तसेच गुलाबी वाडी मधील कातकरी मुलींनी आदिवास नृत्य सादर केले.
या कार्यक्रमात अनेक संस्था आणि व्यक्तींनी सहभाग नोंदवत आपली उपस्थिती तसे जनजागृती करत सहभाग घेतला. प्रवीण विशे यांनी पक्षीजगत बद्दल माहिती दिली तर सुहास पवार यांनी सर्पदंश व उपचार पद्धती सर्पविज्ञान, अंघोळीच्या गोळी संस्थेने पाणीबचत, टिम परिवर्तन यांनी झाडावरील खिळे, इतर संस्था आणि व्यक्तींनी चंदन तथा औषधी वनस्पती, रानभाज्या, बांबू लागवड, आयुर्वेद, निसर्गोपचार व अन्य विषयांवर माहिती देण्यात आली.
काही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले तसेच छायाचित्र प्रदर्शनाद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. सान्वी संस्थेच्या सहकार्याने ५००+ अधिक महिलांना जीवनावश्यक वस्तू आणि १५०+ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले तर काही संस्थांनी कातकरी कुटुंबासाठी शेतात लागवडी दरम्यान पावसाळ्यात वापरले जाणारे इरले विनामूल्य वाटप केले. अशा अन्य पद्धतीने योगेंद्र बांगर यांनी उपस्थीत जनसमुदायाला "समृद्धीच्या वाटा" दाखवल्या.
समृद्धीच्या वाटा कार्यक्रमात जनजागृतीच्या सात्यत्यपूर्ण कार्याची दखल घेत उपस्थित पाहुणे आणि योगेंद्र बांगर यांच्याहस्ते सन्मानपत्र आणि मुरबाड संदर्भ आणि इतिहास हे पुस्तक प्रदान करण्यात आले. या वाटेवर साथी म्हणून नरेंद्र भिवंडीकर व प्रसाद देवरे यांचे सहकार्य मिळाले तसेच ज्येष्ठ सर्पमित्र दत्ता बोंबे, पडघा पोलिस पाटील किशोर बजागे, नागरी संरक्षण दल विभागीय क्षेत्ररक्षक अजित कारभारी, अंघोळीची गोळी संस्थेचे अविनाश पाटील, भूषण राजेशिर्के तसेच हेल्पिंग हॅण्ड चे सर्पमित्र प्रविण भालेराव, कृष्णकांत अहिरे, जय देशमुख उपस्थीत होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते यश बावीस्कर, पवन बाविस्कर व अन्य सहकारी उपस्थित राहिले.
====================================
.jpg)




Post a Comment
0 Comments