ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण ग्रामीण भागातील भाजपाचे ठाणे व पालघर जिल्हा सचिव तसेच कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री निलेश शेलार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाला कल्याण ग्रामीण मधील पंचक्रोशीतील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि निलेश शेलार यांचे मित्र परिवारातील असंख्य सहकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी आपल्या युवा नेत्याला भावी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाजप परिवारातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आपल्या सहकाऱ्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कल्याण ग्रामीणचे तसेच मुरबाड मतदार संघातील सर्वांचे लाडके आमदार श्री किसन कथोरे यांनीही सदर कार्यक्रमास उपस्थित राहून निलेश शेलार यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
.jpg)






Post a Comment
0 Comments