Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पदाधिकारी मेळावा

ठाकरे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब डोंबिवलीत

               ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

  डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कल्याण शिवसेना जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना नेते,विधानपरिषद सदस्य, ॲड.अनिल परब यांच्या अध्यक्षते खाली येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला.निवडणुकीची तयारी,आणि पुढील रणनीती आखण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांना  आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदर मेळावा आयोजित करण्यात आला.येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून वरिष्ठ पातळीवर काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे 

"पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याची ।माहिती उद्धव ठाकरे यांना देणार "- अनिल परब

कल्याण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी मेळावा डोंबिवली पूर्वेतील एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब आले होते. 


यावेळी शिवसेना नेते अनिल परब यांच्यासह  उपनेते व कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख  गुरूनाथ खोत, उपनेते अल्ताफ शेख, जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे  यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण महानगरपालिका क्षेत्रातील येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला कल्याण ग्रामीण विधानसभा, डोंबिवली विधानसभा, कल्याण पूर्व विधानसभा, कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, विधानसभा, शहर व विभाग प्रमुख, महिला आघाडी, युवासेना व अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




 महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी ठोस रणनीती, जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका आणि संघटनेच्या बळकटीकरणासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्यात येणाऱ्या महापालिका निवडणुका, त्यांची तयारी, या तयारीची माहिती घेण्यासाठी आलो असून याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याची माहिती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. 

निवडणूका आल्या की कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह असतो, तो याठिकाणी दिसत असून सद्ध्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असून हळूहळू पुढे सरकू असे अनिल परब यांनी सांगितले. तर अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात हा दुर्दैवी असून यातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.




Post a Comment

0 Comments