केडीएमसीच्या "ई" प्रभागातील नालेसफाई कामाची शहर अभियंता यांनी केली पाहणी
नालेसफाईचे कामे असमाधन कारक आढळल्याने शहर अभियंता अँक्शन मोडवर
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील दहा प्रभाग क्षेत्रातील मोठे नाले, मध्यम स्वरूपाचे नाले गटारांची पावसाळ्यापूर्वी ची स्वच्छता सफाई कोट्यवधीची कामे ठेकदारांमार्फत सुरू असल्याने या कामावर प्रशासनाचा अंकुश असतो. रविवारी ई प्रभागाक्षेत्रातील मोठे, नाले, मध्यम स्वरूपाचे नाले, गटाराच्या सफाई कामाची पाहणी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी रविवारी केली. नालेसफाई कामात ठेकेदाराचा कामचुकार पणा, अपुरे मुन्यषबळ या गोष्टी नजरेत आल्याने शहर अभियंता अनिता परदेशी एँक्शन् मोडवर आल्या असल्याची माहिती मिळाली.
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील सुमारे 4कोटी रू. नाले सफाई कामे तसेच मध्यम स्वरूपाचे छोटे नाले, गटारे यांची सुमारे साडे तीन कोटी रू सफाई कामे विविध एजन्सीच्या ठेकेदारामार्फत सुरू असून पावसाळ्यापूर्वी मोठे नाले, मध्यम स्वरुपाची छोटे नाले, गटारे यांच्या मधील कचरा, तसेच डीप क्लीन करीत पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल. जेणेकरून लो लाईन् परिसरातील परिसरात संभाव्य पाणी शिरणार नाही यांची दक्षता घेतली जाते. जेणेकरून, सखल भागातील रहिवाशांना दिलासा मिळेल आणि पावसाळ्यात पाण्याची तुंबापुरी होणार नाही. यासाठी प्रशासन कोट्यवधीचा खर्च नालेसफाई साठी करते.
नालेसफाई कामे बरोबर होत आहेत का नाही. यासाठी पाहणी केली जाते. रविवारी केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी " ई " प्रभाग क्षेत्रातील नालेसफाईची पहाणी केली असता त्यांच्या निर्दशानास आले की,
संजय नगर सागाव एमआयडीसी मधील नाला दिनांक 24 ते 28 एप्रिल या दरम्यान पूर्ण झाल्याचा अहवाल उपभियंता यांच्या बार चार्ट मध्ये दिसून येतो तथापि प्रत्यक्ष पाहणीत केलेले काम हे केवळ वरचा कचरा व जलपर्णी काढल्याचे दिसून येते नाल्याच्या दोन्ही बाजूचा काठ झाडे झुडपे काढून स्वच्छ केलेला दिसून आले नाहीत. इ प्रभाग क्षेत्रात एकूण 15 नाले असून केवळ दोन ठिकाणी काम सुरू आहेत व तेथे सुद्धा केवळ दहा ते बारा मजूर काम करीत आहेत ही संख्या पुरेशी नाही.
निळजे नाल्याचेही काम अगदी निकृष्ट पद्धतीने केले जात होते. या पाहणी दौऱ्यानिमित्ताने शहर अभियंता ह्या नालेसफाईचा पोलखोलीमुळे संतापल्या असून त्या अँक्शन मोडवर आल्याची माहिती मिळाली असून नालेसफाई कामात दुर्लक्ष करणारे ठेकेदार वेळ काढू पणा करत आहेत व त्याबाबत कोणताही दैनंदिन पाठपुरावा उपअभियंता स्तरावर दिसून येत नाही. तसेच कामाचे प्रत्यक्ष ठिकाणाची एकत्रित पाहण़ी ठेकेदार व उपभियंता यांनी केलेली नाही, हा खूप बेजबाबदारपणा आहे. उपअभियंता हे रजेवर अथवा अन्य कामात व्यस्त असले तरी त्यांनी किमान दोन तासांनी भ्रमण दूरध्वनीवर ठेकेदारावर प्रेशर ठेवणे गरजेचे आहे, तसे दिसून आले नाही.
"सुरू असलेल्या कामावर मी शहर अभियंता म्हणुन समाधानी नाही अशाच प्रकारे अन्य प्रभागाच्याही तक्रारी आहेत. सबब येत्या तीन दिवसात प्रभागातील सर्व कामामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, अन्यथा ठेकेदार व उप अभियंता यांच्यावर नाईलाजास्तव कारवाई करणे भाग पडेल व त्यास आपण सर्वस्वी जबाबदार असाल, याची नोंद घ्यावी अशी तंबी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली असल्याने नालेसफाई कामात कामचुकार ठेकेदार, अधिकारी यांची आता खैर नसल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments