Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीने नसलेले डिव्हायडर रंगवत काढले लाखोंचे बिल; मनसेचा आरोप, रंगाच्या बादल्या ब्रश घेऊन आंदोलन

केडीएमसीने नसलेले डिव्हायडर रंगवत काढले लाखोंचे बिल; मनसेचा आरोप

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

केडीएमसीने मुरबाड रोड ते गुरुदेव हॉटेलपर्यंत डिव्हायडर धुणे व रंगवण्याच्या कामाचे बिल ठेकेदाराला दिली आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणली.

मात्र प्रत्यक्षात स्टेशन परिसरात डिव्हायडर नसताना ही बिल महापालिकेने दिली कशी? असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. याविरोधात मनसेने रंगाच्या बादल्या ब्रश घेऊन आंदोलन केले आहे.

कल्याण- डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांचा आणखी एक प्रताप समोर आला. कल्याण स्टेशन ते गुरुदेव चौकासह, संतोषी माता रोड आणि काही ठिकाणचे फुटपाथ डिव्हायडर रंगवणे व धुण्याचे तब्बल ४० लाखांचे बिल कल्याण- डोंबिवली महापालिकेने काढल्याचा आरोप मनसेने केला. माहितीच्या अधिकारात मनसे कार्यकर्त्यांनी ही माहिती उघड केली आहे. यामुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात आज मनसेने प्रतिकात्मक आंदोलन केलं.

प्रतीकात्मक फुटपाथ, डिव्हायडर रंगवत आंदोलन

मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी मिस्टर इंडियाचे लाल रंगाच्या चष्मे घातले होते. तसेच हातात बादल्या व रंगाचा ब्रश घेऊन प्रतिकात्मक फूटपाथ डिव्हायडर रंगवत टीडीएमसी व केडीएमसी अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी कल्याण स्टेशन ते गुरुदेव चौकापर्यंत डिव्हायडरच नाही; तर मग हे डिव्हायडर रंगवण्याचे धुण्याचे बिल काढले कसे? असा सवाल केला आहे.


भ्रष्ट्र अधिकारी, ठेकेदारांवर कारवाईची मागणी

तसेच इतर ठिकाणच्या देखील फुटपाथ आणि डिव्हायडर रंगवण्याचे काम एमसीएचआय या बिल्डराच्या संघटनेला दिले आहे. तो खर्च ती संघटना करणार आहे. त्याचा महापालिकेचा बिलाशी काही संबंध नाही, मग त्यांचे बिल देखील केडीएमसीने काढले कसे? असा सवाल केला. महापालिका अधिकारी स्वतःची तिजोरी भरत आहेत. केडीएमसी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई केली नाही; तर मनसे अशा अधिकाऱ्यांना ठोकणार असा इशारा दिला.

Post a Comment

0 Comments