ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) चे कल्याण विधानसभा सह संघटक रूपेश भोईर यांची महाराष्ट्र रिक्षा-टॅक्सी सेनेच्या कल्याण शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र रिक्षा-टॅक्सी सेनेचे ठाणे जिलाध्यक्ष आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी रूपेश भोईर यांना नियुक्ती पत्र दिला आहे. विभिन्न सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य सेवेत काम करणारे रूपेश भोईर यांनी वेळो वेळी रिक्षा आणि टैक्सी चालकांना न्याय मिळवून दिलेला आहे. सोबतच कल्याण (प ) येथील रेलवेच्या हद्दीत असलेल्या आणि बंद पडलेल्या रिक्षा स्टैन्ड ला पुनः सुरू करण्या साठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. त्याचीच पोच पावती म्हणून महाराष्ट्र रिक्षा-टॅक्सी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी महाराष्ट्र रिक्षा-टॅक्सी सेनेचे सरचिटणीस गोपाळ नवगिरे यांच्या उपस्थितीत रूपेश भोईर यांची नियुक्ती कल्याण शहर कार्याध्यक्ष पदी केली आहे.
नियुक्ती पत्र देताना जाधव यांनी रूपेश भोईर बद्दल आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की ''रूपेश भोईर यांची कार्यपद्धती पक्षा साठी आणि संघटने साठी महत्वाची आहे". ह्या वेळी रूपेश भोईर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगीतले की सदरची जवाबदारी मी योग्यरीत्या पार पाडेन आणि रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रत्येक समस्येचा निदान करण्याचा प्रयत्न करेन .रूपेश भोईर यांच्या नियुक्ती चे शिवसेना वाहतुक सेनेचे शहर अध्यक्ष निलेश भोर यांनी स्वागत केलं आहे आणि पुढच्या वाटचाल साठी शुभेच्छा दिल्या.
.jpg)

Post a Comment
0 Comments