Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण – डोंबिवलीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ


कचरा संकलन वाहतूक, रस्ते सफाई आणि

शहर स्वच्छतेसाठी स्वतंत्र अत्याधुनिक

यंत्रणा उभी राहणार


खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या

समन्वयातून अभियान


                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन वाहतूक, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा रविवार, १८ मे रोजी डोंबिवली पूर्वेतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात सायंकाळी ४.३० वाजता या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ७ प्रभागातील कचरा संकलन व वाहतुक याचबरोबर रस्ते सफाईकरीता अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हे अभियान राबविण्यात यावे यासाठी पुढाकार घेतला होता.


राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या  सहकार्याने कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने विविध शहरातील कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात खासदार डॉ.शिंदे यांनी प्राधान्य दिले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहराचा संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हाही याचा एक भाग आहे. याच पद्धतीने कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी विशिष्ठ यंत्रणा देखील कार्यन्वित करण्यात येणार आहे.

कल्याण  डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन वाहतूक, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाच्या माध्यमातून प्रभागातील कामकाजावर नियंत्रण ठेवण्याकरीता २४७ कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार आहेत. तर नागरिकांमार्फत प्राप्त तक्रारींचे निवारण करण्याकरीता स्वतंत्र मनुष्यबळ व यंत्रणा उभी केली जाणार असून २४ तास कार्यरत कक्ष उभारण्यात येणार आहेत. ५ ठिकाणी वेस्ट टू वेल्थ सेंटर्स उभारणी करण्यासमवेतच  प्राथमिक कचरा संकलनाकरीता पर्यावरण पुरक बॅटरीवर चालणारी वाहने व चार्जिंग स्टेशनसह अत्याधुनिक पाकींग व्यवस्था उभारली जाणार आहे. तर कचरामुक्त रस्ता संकल्पने अंतर्गत शहरातील एकूण रस्त्यापैकी ३० टक्के रस्ते कचरामुक्त राहणेकरीता स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे.

तसेच मृत जनावरांचे अवशेष व हरीत कचरा, घरगुती घातक कचरा संकलनाकरीता स्वतंत्र यंत्रणा, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची देखभाल व दुरुस्ती करीता अत्याधुनिक सोयीसुविधांसह ऑटो वर्कशॉप, चाळ परिसर व रस्त्यालगत असलेल्या जीव्हीपी ठिकाणे (सतत कचरा पडणारी ठिकाणे) निर्मुलनाकरिता सिटी हुक लोडर यंत्रणा (कचरा उचलणारी अत्याधुनिक वाहने) उभी करण्यात येणार आहेत. तसेच नागरीकांमध्ये दैनंदिन जनजागृतीकरिता स्वतंत्र जनजागृती पथक, चाळ व झोपडपट्टी पसिरातील घरोघरी कचरा संकलनाकरिता स्वतंत्र पथक, अपात्कालीन परिस्थिती हाताळणेकरिता विशेष सुविधा या सर्व सुविधांची यात उभारणी करण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments