Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची समुपदेशनाने बदली प्रक्रिया

                ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर

 जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग 3) व गट-ड (वर्ग 4) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने दि. १५ मे ते १६ मे रोजी दरम्यान ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या पारदर्शक पद्धतीने बी. जे हायस्कुल सभागृह, ठाणे येथे राबविण्यात येणार आहे.

         बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने तात्पुरती यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर कर्मचाऱ्यांनी आक्षेप असल्यास ते सादर करण्याची संधी देण्यात आलेली असून, त्यानंतर अंतिम बदली यादी जाहीर करण्यात आली आहे.

         बदली प्रक्रिया समुपदेशनाच्या माध्यमातून राबविली जाणार असून, कर्मचाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून बदलीसाठी ठिकाणाची मागणी करावी. बदली प्रक्रिया फेसबुक व यूट्यूब या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर (Live) प्रसारित केली जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले आहे.
 
शासन निर्णयानुसार बदली प्रक्रिया पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे:
टप्पा क्रमांक तपशील
I आदिवासी भागातील प्रशासकीय प्राधान्य क्रमांक 1 ते 7 कर्मचाऱ्यांचे समुपदेशन
II बिगर आदिवासी भागातील प्रशासकीय प्राधान्य क्रमांक 1 ते 7 कर्मचाऱ्यांचे समुपदेशन
III आदिवासी भागात सलग किमान 3 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवाज्येष्ठतेनुसार समुपदेशन (2(4) धोरणानुसार)
IV वास्तव्य जेष्ठतेनुसार बिगर आदिवासी क्षेत्रातील उर्वरित कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय समुपदेशन
V विनंती बदल्या – प्राधान्य क्रमांक 1 ते 12 कर्मचाऱ्यांचे समुपदेशन
VI उर्वरित विनंती बदल्यांचे समुपदेशन
VII आपसी बदल्या – समुपदेशनाद्वारे

          ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, अर्थ विभाग, सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक) या विभागाच्या बदल्या दि. 15 मे रोजी तर ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग या विभागांच्या बदल्या दि. 16 मे रोजी पार पाडणार आहे. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेत स्वत: उपस्थित राहून बदली प्रक्रियेमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments