पदपथावरील झाडाची सावली
हरपल्याने नागरिकांचा संताप
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
ऐन उन्हाळ्यात उन्हाचा चटका आणि आंगाची होणारी काहिलीपासून झाडाच्या सावलीत थांबल्यावर क्षणभर तरी हायसे वाटते. पंरतु कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड परिसरातील पदपथालगतच्या झाडाची छाटणी कुणाच्या हितासाठी केली असा संतापजनक सवाल नागरिकांकडून होत आहे.
कल्याण पश्चिम मध्ये आग्रा रोड येथे नवीन कल्याण ज्वेलर्स नावाने नवीन शोरुम सुरू करण्यात आले आहे. हे शोरुम स्पष्ट दिसावे म्हणून त्या शोरुम समोरील जुन्या झाडाची छाटणी लगबगीने करण्यात आली. धोकादायक झाडाची छाटणी करण्यासाठी अर्ज आदी स्पोस्कर केले तरी पाठपुरावा केला तरच प्रशासन छाटणीचे काम मार्गी लावते. असे असतानाच मात्र संदर्भीत परिसरातील उन्हाळ्यात सावली देणार्या झाडाची छाटणी कोणाच्या हितासाठी झाली असा सनसनाटी आरोप दक्ष नागरिकांकडून यानिमित्ताने होत आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments