ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर वार्ताहर
दिनांक ३ मे २०२५ रोजी उल्हासनगर येथील सेवासदन शिक्षणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त) आणि "अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष" (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा सदन शिक्षण महाविद्यालय उल्हासनगर येथे सेवासदन ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त मा.श्री.संजय डबराई, आणि सेवासदन ट्रस्टचे सचिव मा.श्री. कमलेश तलरेजा यांच्या प्रेरणेने “कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शिक्षण...संधी आणि आव्हाने” या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र (हायब्रिड मोड) आयोजित करण्यात आले होते.
चर्चासत्राच्या सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले तर सेवासदनच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात सरस्वतीवंदना व विद्यापीठ गीत सादर केले. यावेळी प्रभारी प्राचार्या डॉ. रेणुका शेवकानी यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला. तर प्रमुख अतिथी आणि उद्घाटक तन्मय बलवा (संचालक शैक्षणिक, न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, सोनीपत) यांनी चर्चासत्राचे उद्घाटन केले.
याप्रसंगी डॉ. अविनाश डांगवानी (सहयोगी प्राध्यापक, व्हीईएस पॉलिटेक्निक, चेंबूर, मुंबई) यांनी उत्तम प्रकारे चर्चासत्राचे बीजभाषण केले. प्रथम व द्वितीय सत्रात अनेक संशोधन अभ्यासक यांनी आपले रिसर्च पेपर प्रेझेंटेशन केले. संबंधित रिसर्च पेपरच्या अनुषंगाने डॉ. काला, (प्राचार्य, आरकेटी कॉलेज) आणि डॉ. गुलाब चंद गुप्ता, (प्राचार्य, SSCOA) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सन्माननीय अतिथीं प्रा.देवेंद्रजी कोडवानी (उच्च शिक्षण अकादमीचे वरिष्ठ फेलो, कुलगुरूंचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय आणि पदव्युत्तर कार्यक्रम, द ओपन युनिव्हर्सिटी, यूके) यांनी आदर्श रिसर्च पेपर प्रेझेंटेशनसाठी अत्यंत सुंदर भाषण केले. तर शेवटच्या सत्रात डॉ. पांडुरंग व्ही. बरकाले (सल्लागार, उच्च शिक्षण राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा), महाराष्ट्र शासन, मुंबई) यांनी आणि डॉ अरुल पी. (ग्रंथपाल, सेवा सदन शिक्षणशास्त्र महाविद्यालय) यांनी उत्तम मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रेणूका शेवकानी, प्राध्यापक डॉ.संजय निंबाळकर, सहयोगी प्राध्यापिका डॉ.हिना वाधवानी, डॉ.संध्या महाजन डॉ. राजकुमारी पंजाबी, डॉ. भक्ती जयसिंघानी, डॉ.रुक्मिणी जामदार, डॉ.मेरी वर्गीस, डॉ.राजश्री जोशी, डॉ.शीतल शिरोळ, डॉ.स्नेहा सामंत आदी मान्यवर आणि प्रा.सुनील म्हसकर प्रा. सुनील निंबियार, प्रा.सचिन पाटील, प्रा.अर्चना भालेवार असे अनेक संशोधन अभ्यासक उपस्थित होते. या चर्चासत्राच्या प्रसंगी देशभरातून विविध विद्यापीठ व शैक्षणिक व सामाजिक संस्थांमधून आलेल्या प्राध्यापक व संशोधन अभ्यासक तसेच मुख्य विषयाशी संबंधित अनेक नाविन्यपूर्ण विषयांवरील संशोधन प्रबंध व शोध निबंध सादर केले. संशोधन अभ्यासक प्रा.सुनील निंबियार आणि प्रा.सुनील म्हसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रेणूका शेवकानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक यांच्या अथक परिश्रमाने तसेच बी.एड. व डी.एड. विद्यार्थ्यांच्या मदतीने सदर चर्चासत्र यशस्वीपणे पार पडले. डॉ.रुक्मिणी जामदार यांनी चर्चासत्राचे अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन डॉ.रुक्मिणी जामदार व डॉ.राजकुमारी पंजाबी यांनी केले. या चर्चांसत्रासाठी एल. सी. पोतदार, राहुल तपासे, अगस्ती चौधरी यांनी तांत्रिकदृष्ट्या सहकार्य केले.राष्ट्रीय गीताने सदर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप करण्यात आला.
.jpg)

Post a Comment
0 Comments