Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले


                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे उल्हासनदी दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी धोक्याची पातळी देखील उल्हासनदी पाण्याने ओलंडली . मोहेली परिसरातील तीन गुरखी गुरे चारण्यासाठी गेले असता  मोहिली आणि गाळेगाव परिसरातील उल्हासनदी पात्रातील बेटावर सोमवारी  आढकल्याने त्यांचा जीव टांगणीला लागल्याची घटना  घडली.          
           कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ उल्हास नदी वाहते. यावेळी पावसामुळे उल्हास नदी पाण्याची पातळी वाढली आणि मोहिली ते गाळेगाव दरम्यान उल्हासनदी पात्रात असलेल्या बेट सदृश्य भागात तीन गुराखी अडकले. उल्हासनदीची पुराच्या पाण्याची वाढती पातळी आणि जीव धोक्यात आल्याने  सावल्या वाघे वय 65, शंकर पाटील वय 55, देव गायकर वय 60 सर्व राहणारे मोहाली  यांची याप्रसंगातून सुटका कशी होणार यासाठी प्रशासन "अ" प्रभागक्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, आप्तकालीन यंत्रणा, कर्मचारी वर्ग, अग्निशमन दलाचे जवान, महसूल विभाग कर्मचारी कल्याण तालुका यांनी बचाव कार्य सुरू केले.


 गाळेगाव येथील स्थानिक कोळीबाधंव गुरूनाथ पवार, रोहन पवार यांनी उल्हासनदी पत्राच्या पुराच्या पाण्यात धारेवर कुशलरित्या आणि अनुभवीपणे होडी चालवीत बेटा पर्यंत जात तीनही गुरख्यांची सुखरूप सुटका करीत सुरक्षित रित्या नदी किनारी आणलेले पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. गुरनाथ पवार, रोहन पवार यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडचे आहे. देवदुत बनत दुसर्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः चा जीव धोक्यात टाकून इतरांचा  जीव वाचविणे मोठे धाडसाचे देवदुता सारखे काम त्यांनी केल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.  तहसीलदार सचिन शेजाळ यांनी तातडीने गुरूनाथ पवार, रोहन पवार यांच्या कामांची दखल घेत कल्याण तहसीलदार कार्यालयात रोख बक्षीस देत सत्कार, केला आणि त्यांच्या प्ररेणादायी, धाडसी कामाचे कौतुक केले.


Post a Comment

0 Comments