"घाटाचे बांधकाम थांबवावे, संबंधितांवर कार्यवाही करावी" सरिता खानचंदानी यांची उल्हासनगर महानगरपालिकेस नोटीस..
ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर वार्ताहर
बदलापूर तहसीलदारांनी उल्हास नदीच्या काठावर आणि पात्रात सत्संग विहार संस्थेने केलेल्या खनन, उत्खनन आणि माती भराव प्रकरणी उक्त संस्थेला 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आणि उक्त भराव काढण्याचे आदेश दिले,
त्याचप्रमाणे उल्हासनगर कॅम्प 1 म्हारळ गाव येथे असलेल्या रिजेंसी अँटिलिया इमारत संकुलातही उल्हासनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार कुमार आयलानी यांच्या निधीतून आणि प्रयत्नांमुळे उल्हास नदीच्या काठावर आणि पात्रातच घाटाचे बांधकाम केले जात आहे.
उल्हासनगर उपविभागीय अधिकारी, ठाणे जलसंपदा विभागाने उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांना नोटीस जारी करूनही उल्हास नदी घाट बांधकाम थांबत नाही,घाटाचे बांधकाम त्वरित थांबवावे, संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणी करत हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी उमपा प्रशासनाला नोटीस जारी केली आहे.
कर्जत आणि रायगड इरिगेशन डिपार्टमेंटने उक्त विषयांवर गांभीर्याने कार्यवाही केली आहे, त्याच धर्तीवर कळवा ठाणे इरिगेशन विभागाने देखील कठोर कारवाई करावी,उक्त क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली आहेत, नदीच्या पात्रात खनन, उत्खनन आणि सिमेंटीकरण तसेच भरावाला परवानगी नसतानाही सुरू असलेल्या घाट बांधकामावर कधी कारवाई करणार, अशी मागणीही करण्यात आली आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments