Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीच्या "अ" प्रभागात आपत्कालीन टीमने केला पाहणी दौरा

 

पावसाळ्यात पाण्याचा निचारा, चेंबरची झाकणे,  होर्डिंग आदी समस्यांचा घेतला आढावा
         
                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील ग्रामीण "अ"  प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा, बल्याणी, मोहने, आंबिवली, अटाळी, मोहेली, ऊभंर्णी,  शहाड, परिसराचा केडीएमसीच्या आप्तकालीन टीमने दौरा करीत नाले सफाई कामे, गटारे सफाई आदी कामाची पाहणी केली. जेणेकरून पावसाळ्यात पाण्याचा निचारा व्यवस्थित रित्या होईल आणि संभाव्य पूरपरिस्थिती टाळता येईल. या पाहणी दौर्यात उप आयुक्त संजय जाधव, सहाय्यक आयुक्त  अ प्रभागक्षेत्र प्रमोद पाटील, उप अभियंता हरुण इनामदार, अभियंता ओमकार भोईर, आरोग्य निरिक्षक मोनिश गडे आदिसह कर्मचारी वर्गाचा समावेश होता.


                      
 "अ" प्रभागक्षेत्राचा पाहणी दौरा संपूर्ण आपत्कालीन टीम आणि सर्व संबंधित यांचे समवेत केल्याने पावसाळ्यापूर्वी ग्राऊंड रिपोर्ट घेत मुख्य नाले  यांची सफाई  प्रगतीपथावर असून बल्याणी परिसरात  दोन क्रिटिकल ठिकाणे आढळून आली त्यापैकी एका ठिकाणी रविवारी पोकलेन उतरवून काम सुरु केले आहे. बल्याणी येथे बडोदा महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी पाणी भरण्याची स्थिती होईल त्या अनुषंगाने त्यांच्या ऍथॉरिटी सोबत समन्वय साधला आहे . ते आपल्याला मशिनरी देणार असून रविवारी तात्काळ काम करणार असल्याने पाणी तुबूंणार नाही. 

होर्डिंगचा संभाव्य धोका विचारात घेता 2 होर्डिंग काढण्यात आली असून पाण्याचा निचरा होण्यासाठी  विपहोल मोकळे होते. छोटे नाले साफ केलेली माती उचलेली असल्याचे दिसून आले. पहिल्याच पावसात पाणी थांबू नये म्हणून विप होल मोकळे करण्यासाठी लेबर सज्ज ठेवले असून
 चेम्बर वरील झाकणे बसविण्याचे काम सुरु आहे . 
 धोकादायक इमारत समस्या निर्दशनास आली नाही.
पावसाळ्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याने संभाव्य आप्तकालीन परिस्थितीत प्रशासन सज्ज झाले आहे. 

  

Post a Comment

0 Comments