Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जीएसटी विभागातील राज्यकर निरीक्षक लियाकत नाईक, या फसव्या कर्मचा-याने रुपये २६,४०,०००/- गंडा घातला

       ⬆️लियाकत नाईक, 

 जीएसटी विभागातील राज्यकर निरीक्षक असलेल्या लियाकत नाईक, या कर्मचा-याने आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने सामाजिक संस्थेला २६,४०,०००/- गंडा घातला

                    ब्लॅक अँड व्हाईट मुंबई प्रतिनिधी

फिर्यादी  ॲड. इम्तियाज अहमद इस्माईल पटेल हे पेशाने वकील असून मंबईत ते वकिली व्यवसाय करतात.  फिर्यादी यांचे मुळ गांव  हरकुळ बदुरुक् , तालुका – कणकवली,  जिल्हा – सिंधदुर्ग असून सदर गावच्या लोकांची ‘अंजूमन ए रहमानी हरकुळ बदुरुक असा ट्रस्ट आहे व तो धर्मादाय आयक्त कार्यालयात रजिस्टर केलेला आहे.  सदर ट्रस्ट मार्फत समाजात राहणाऱ्या लोकांसाठी सामाजिक कार्य केले जाते.  मुलांच्या शिक्षणांसाठी, अनाथ मुलीच्या लग्नासाठी व आर्थिक दीनदुबळ्या लोकांसाठी वैद्यकीय मदत केली जाते. सदर ट्रस्टचे ट्रस्टी हे दोन वर्षासाठी निवडून येतात.  

सन २०१७ साली नवीन कमिटी निवडून आली त्यामध्ये जीएसटी विभागात राज्यकर  निरीक्षक पदावर सध्या  काम करीत असलेले कर्मचारी श्री. लियाकत महमद नाईक सदर हे ट्रस्टचे सेक्रेटरी म्हणून निवडून आले.  सदर ट्रस्टचे बँक खाते हे, बँक ऑफ महाराष्ट्र, जी. एस. टी. भवन, माझगाव शाखा व फोर्ट शाखा अशी दोन व बॉम्बे मर्कनटाईल बँक फोर्ट शाखा, दोन खाती अश्या एकूण चार खात्यामध्ये ट्रस्टचे पैसे जमा होते.  त्यामध्ये संस्थेचे साधारणपणे २५ लाख रुपये जमा होते.  श्री. लियाकत महमद नाईक हे ट्रस्टचे सेक्रेटरी म्हणून  निवडून आल्यानंतर त्यांचा व इतर कमिटीचा कार्यकाल हा सन २०१९ पर्यंत होता. परंतु सेक्रेटरी व इतर पदाधिकारी यांनी २०१९ पासन सभा घेण्यास टाळाटाळ केली व कोणताही हिशोब हा सर्वसाधारण सभेपुढे ठेवलेला नाही. सबब फिर्यादी वकील श्री. इम्तियाज पटेल यांनी सर्व बँक खात्याची चौकशी केली असता, त्यांच्या असे निदर्शनास आले की, श्री. लियाकत महमद नाईक यांनी व इतर पदाधिकारी कार्याध्यक्ष व खजिनदार यांच्या संगनमताने ऑगस्ट २०१९ पासन बऱ्याचशा रकमा ह्या आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये वळत्या केल्या व काही रकमा रोख स्वरूपात काढलेल्या होत्या. अशा प्रकारे २०१७ ते सप्टेंबर २०२२ पर्यंत एकूण रक्कम रु. २६,४०,०००/- आपल्या व वैयक्तिक फायद्याकरीता, स्वार्थाकरीता बेकायदेशीर रित्या वापरलेल्या होत्या.

फिर्यादी वकील श्री. इम्तियाज पटेल यांनी याबाबत माता रमाबाई आंबेडकर मार्ग येथे लेखी तक्रार करून कायदेशीर कारवाईची मागणी केली. याबाबत सदर पोलिस ठाणे येथे श्री. लियाकत महमद नाईक व इतर दोन  पदाधिकारी श्री रफीक अहमद इस्माईल पटेल व श्री. नूर मोहम्मद उस्मान पटेल यांचे  विरुद्ध कलम ४२०, ४०६, ३४ खाली गुन्हा क्रमांक २१७/२०२३ अन्वये नोंद करण्यात आला.सध्यस्थितीत आरोपी हा जामिनावर मुक्त आहे व त्यांचे  विरुद्ध बेलार्ड पियर कोर्ट येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.   याबाबतीत फिर्यादी यांनी  सहआयक्त राज्यकर  (विशेष), मंबई यांचेकडे राज्यकर  निरीक्षक कर्मचारी श्री. लियाकत महमद नाईक यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणक व अपील) नियम, १९७९ कलम ४(१)(क) अन्वये निलंबनाची कारवाई करण्यासाठी  दिनांक ०२.०१.२०२५ रोजी तक्रार दाखल केलेली आहे. याबाबतीत गेले पाच महीने फिर्यादी वकील श्री. पटेल यांना कारवाई बाबत वस्तू व सेवाकर विभागातून कांहीही कळविण्यात आलेले नाही.

 सबब फिर्यादी वकील  यांनी दि. ०९.०५.२०२५ रोजी माहिती अधिकाराचा वापर करून संबंधित विभागाने केलेल्या कारवाईचा तपशील व धाराणीतील सर्व कागदपत्रांच्या केलेल्या कारवाईच्या सांक्षाकित व प्रमाणित कागदपत्रांची  मागणी केलेली आहे.  तरी आता सदर प्रकरणात पुढील चित्र हे  लवकरच स्पष्ट होईल.

तरी जीएसटी विभागातील सर्व अधिकारी/कर्मचारी व इतर  सर्व सामान्य नागरिकांनी श्री. लियाकत नाईक याच्या  आर्थिक व्यहाराला कोणीही बळी पडू नये, कि जेणेकरून पुढे फसगत होईल व त्याच्या पासून अतिशय  सावधान रहावे. असे वकील श्री. इम्तियाज पटेल फिर्यादी म्हणून सर्वसाधारण नागरिकांना जाहीर  आवाहन केले आहे.

अधिक माहिती साठी संपर्क. ॲड. इम्तियाज पटेल, मुंबई. 

भ्रमणध्वनी क्र.९८६७०४२००२ / ९८२१६९८९७२*

ईमेल  imtiyaz.adv@gmail.com


Post a Comment

0 Comments