Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कोळसेवाडी पोलीसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

 

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीसांनी मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून मोटार सायकलसह चोराला अटक केली आहे.

कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडणारे  वाहन चोरी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या  सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कोळशेवाडी पो.स्टे. मध्ये दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या टिव्हीएस कंपनीची एन्ट्रॉक स्कूटी व अज्ञात आरोपीचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती प्राप्त करून रेकॉर्डवरील आरोपी पियुष मधूकर जाधव, वय २० वर्षे, रा. काटेमानीवली नाका, कल्याण पुर्व याला मंगळवारी लोकग्राम सर्कल, कल्याण पुर्व येथे ताब्यात घेवून त्याच्याकडून चोरी केलेली  ८० हजार रू. किमंतीची टिव्हीएस कंपनीची एन्ट्रॉक स्कूटी हस्तगत करण्यात आली आहे.

 त्याला गुन्हयाच्या तपासाकामी ताब्यात घेवून अटक केली आहे. हि कारवाई पोलीस उपआयुक्त  अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त  कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणेचे वपोनिरी. गणेश न्हायदे, सपोनिरी. दर्शन पाटील, पोहवा मिलींद बोरसे, राजेश कापडी, भागवत सौंदाणे, भगवान सांगळे, विलास जरग, नरेश दळवी, पो.शि. दिलीप सोनावळे, प्रदिप गिते यांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments