Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आमदार राजेश मोरे यांनी घेतली केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट

 

शहरातील विविध समस्या सोडविण्यावर भर

देण्याची केली मागणी


                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण डोंबिवली शहरातील आरोग्य व्यवस्था, शिक्षण, स्वच्छता नालेसफाई क्लस्टर योजना भुयारी गटार योजना, धोकादायक इमारती यासारख्या विविध विषयांवर प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याबाबत आज कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याबरोबर चर्चा केली. मालिका क्षेत्रात सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी सदानंद थरवळ, माजी नगरसेवक आणि तालुकाप्रमुख महेश पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक बंडू पाटील, युवासेना शहर अधिकारी सागर जेधे, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड  यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शहरातील नागरिकांना उपचार मिळत नसल्याबाबत खंत व्यक्त करताना आरोग्य  सुविधा सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना आमदार मोरे यांनी आयुक्तांना केल्या. आज शुक्रवार ९ मे रोजी आमदार मोरे यांनी शहरातील विविध समस्यांबाबत आयुक्त गोयल यांच्याबरोबर पालिका मुख्यालयात चर्चा केली. यावेळी त्यांनी पावसाळ्यापूर्वी मुख्य नाल्यांची पूर्ण सफाई करा वरवर सफाई करण्यापेक्षा नागरिकांना दिलासा द्या.  ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करा यासारख्या सूचना दिल्या. तर महापालिकेच्या जागा संरक्षण भिंती बांधून ताब्यात घ्या ज्यामुळे त्यावर अतिक्रमण होणार नाही, दत्तनगर परिसरात महापालिकेच्या असलेल्या साडेतीन एकर जागेवर तातडीने क्लस्टर योजनेचा प्रकल्प सुरू करा यासारख्या सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या

महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयात वर्षानुवर्षे डॉक्टरेतर कर्मचारी ठाण मांडून बसले असून हे कर्मचारी मनमानी करत आहे. यामुळेच या कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करा अशी मागणी आमदार मोरे यांनी आयुक्तांकडे केली आयुक्तांनी याच बैठकीत याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देत अहवाल मागवला आहे.


Post a Comment

0 Comments