Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सरकारी नोकरी हवी पण सरकारी शाळेचे शिक्षण नको



ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख 

सरकारी नोकरी सर्वांनाच हवीशी वाटते! ती मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा देऊन ती नोकरी मिळवण्याचं तरुण-तरुणी अतोनात प्रयत्न करत असतात. शैक्षणिक क्षेत्राला आजच्या घडीला व्यवसायाचे स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे; पूर्वी सर्व लहान मुले ज्यांचे व तीन ते सहा च्या आत मध्ये आहे अशी मुले मुली बालवाडी किंवा अंगणवाडीमध्ये खेळताना बागडताना दिसायची. सर्वजण आनंदात खिचडी, चणे, वटाणे लापशी, बिस्किट यांसारखे पदार्थ बालकांना अंगणवाडीत मिळायचे. आता देखील ते मिळत आहेत परंतु ते खाऊ खाण्यासाठी बालवाडी मध्ये मुलच पाहायला मिळत नाही. अशी परिस्थिती सरकारी शाळांची झाली आहे. आजच्या घडीला ग्रामीण व शहरी भागात सरकारी शाळांमध्ये मुलांची पटसंख्या ही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. पूर्वीच्या काळी लोकांसमोर अधिक पर्याय उपलब्ध नव्हते; त्यामुळे गावची सर्वच मुले ही सरकारी शाळांमध्ये शिकून मोठी झाली.

 बरेचसे विद्यार्थी या सरकारी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकून अधिकारी बनले, डॉक्टर घडले, व्यावसायिक बनले, इंजिनियर झाले परंतु आजच्या घडीला हेच पालक आपल्यासमोर खाजगी शाळामध्ये दर्जेदार शिक्षण प्रणाली असल्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना अमाप पैसे खर्च करून प्रवेश मिळून देतात. परंतु त्या पाल्याला मराठी अवगत होत नाही ना धड इंग्रजी बोलायला जमत देखील नाही. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा वाचल्या पाहिजेत. त्यात पुन्हा पहिल्यासारखे विद्यार्थी घडले पाहिजेत याकरता आपण सर्व नागरिकांनी कटिबंध होऊन याबाबत जनजागृती करूया. मी देखील एक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन इथपर्यंत पोहोचलेला विद्यार्थी आहे. अनेक पालकांना वाटते की त्या सरकारी शाळेपेक्षा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत अनेक सोयी सुविधा उत्तम दर्जेदार शिक्षण मुलांना खाजगी शाळांमध्ये मिळेल; सरकारी शाळेचा दर्जा  खालावत चालला आहे. पण आपण जोपर्यंत पाठपुरा करून मागणी करत नाही तोपर्यंत प्रशासनाला देखील जाग येणार नाही यासाठी आपण देखील पुढाकार घ्यावा ज्या मराठी शाळेने आपणा सर्वांना घडवलं त्या शाळांना वाचवूया.

 एसटी महामंडळाने  एसटी विभागात नवनवीन बदल करून एसटी महामंडळाची शान असलेली लाल परी वाचण्याचे काम केलं; त्याचं प्रमाणे आपण देखील पुढाकार घेऊन मराठी माध्यमांच्या शाळा वाचवूया कारण याच त्या गोष्टी आहेत; जसे की एसटी, ग्रामीण रुग्णालय व सरकारी शाळा यांचा वापर सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीय आपले कष्टाचे पैसे बचत करण्यासाठी वापरत असतात त्यामुळे आपण  यांचा पुरेपूर वापर केला पाहिजे. व काही त्रुटी असल्यास त्या प्रशासनाच्या निदर्शनात आणून देणे हे देखील  आपलं कर्तव्य आहे. जर नोकरी सरकारी हवी आहे तर सरकारी आस्थापनांचा  वापर देखील आपण केलाच पाहिजे.

निलेश दत्तात्रेय कुंभार 

मास्टर आर्ट्स कम्युनिकेशन जर्नालिझम *(MACJ)*

Post a Comment

0 Comments