Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी क्षेत्रात कोरोनाचा दुसरा बळी

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली  मनपाक्षेत्रात कोरोनाने शिरकाव करीत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आल्याने केडीएमसी क्षेत्रात करोनाने हातपाय पसरण्यास सुरूवात केली असल्याचे दिसून येते. प्रशासनाने कोरोनाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज असून करोना संदर्भात घेण्याची दक्षता,  काळजीबाबत प्रशासनाकडून नागरिकांना अवहान करण्यात आले आहे.                                            
         केडीएमसी क्षेत्रातील बुधवारची कोरोना रुग्ण संख्या - ०1 असून एकूण रुग्ण - 8 झाले आहेत. तर यापैकी रुग्णालयात दाखल कोरोना रुग्ण - 2 खाजगी रुग्णालयात असून डिस्चार्ज दिलेल्या कोरोना रूग्ण संख्या  3 आहे. तर
  कोरोना अवहाल अंती    मृत्यू संख्या - 2 (सहव्याधी) आहे. गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना रूग्ण संख्या - 1 असून या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
 
 केडीएमसी क्षेत्रात कोरोना मुत्यू झालेल्या पैकी   डोंबिवलीतील 67 वर्षाचा इसम ,दि. 24 मे 2025 रोजी खाजगी हॉस्पिटल डोंबिवली येथे ऍडमिट होता.  या रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट 24 तारखेला केली गेली असता ती पॉझिटिव्ह आली होती. या व्यक्तीस दिनांक 25 मे 2025 रोजी ठाणे येथील कळवा हॉस्पिटल येथे ऍडमिट केले गेले. या व्यक्तीला सहव्याधी म्हणजे हायपरटेन्शनचा व मधुमेहाचा त्रास होता तसेच  बारा वर्षांपूर्वी आलेल्या स्ट्रोकमुळे या व्यक्तीस पॅरालिसिसस झाला होता. या व्यक्तीचा मृत्यू दिनांक 28 मे 2025 रोजी सायंकाळी कळवा हॉस्पिटल येथे झाला आहे. या व्यक्तीने कोविड लस घेतलेली नव्हती अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments