Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गांजा तस्करांवर परिमंडळ-३ पोलिसांची धाड

 

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण परिमंडळ – ३ पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाच वेळी ३ वेगळ्या ठिकाणी गांजा तस्कारांवर धाड टाकली. या प्रकरणी ३ गांजा तस्करांकडून १ किलो ८२५ ग्रॅमहून अधिक गांजा जप्त करण्यात आला. यात शहनाज इराणी या महिलेसह गोपाळ भिडे, तुकाराम गायकवाड यांना पोलिसांनी (ता. १२) रोजी अटक केली आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गांजा तस्करांना परिमंडळ – ३ च्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चांगलाच इंगा दाखवला. या पथकाने तीन विविध ठिकाणी केलेल्या विशेष कारवाईत हे गांजा तस्कर पकडले गेले. यात कल्याण पूर्व परिसरातून २३ वर्षीय तुकाराम गायकवाड या आरोपीला पोलिसांनी पकडले. यावेळी त्याच्याकडे १ किलो ५७ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ आढळला. त्याच्याविरुद्ध कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

तर, बाजारपेठ पोलीस ठाणे हददीतून अमृतपर्ल बिल्डींगच्या बाजूला, कोळीवाडा ते बकरामंडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या इथे ४५ वर्षीय गोपाळ गणपत भिडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी भिडेकडून ३७० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आंबिवली रेल्वे फाटकाजवळ ६५ वर्षीय शहनाज इराणी ही महिला पोलिसांना गांजासह आढळली. यावेळी तिच्याकडून ४५५ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. ही महिला कुख्यात इराणी वस्तीतील असल्याचे बोलले जात आहे. या महिलेविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी परिमंडळ - ३ कल्याण विशेष कारवाई पथक व स्थानिक पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली आहे.

Post a Comment

0 Comments