"आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावं असं कल्याण डोंबिवलीकरांचे स्वप्न आहे आणि स्वच्छतेच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे कल्याण डोंबिवलीचे रूप, स्वच्छतेच्या माध्यमातून बदलेल " ............. उपमुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांना मी मी
डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात विविध उपक्रमांचे लोकार्पण व भूमिपूजन मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
या स्वच्छता अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ७ प्रभागातील कचरा संकलन व वाहतुक याचबरोबर रस्ते सफाईकरीता अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हे अभियान राबविण्यात यावे यासाठी पुढाकार घेतला होता. या अभियानांतर्गत शहर स्वच्छतेच्या कामाच्या माध्यमातून प्रभागातील कामकाजावर नियंत्रण ठेवणेकरीता २४७ कमांड कंट्रोल सेंटर, नागरिकांमार्फत प्राप्त तक्रारींचे निवारण करणेकरीता २४ तास कार्यरत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच ५ ठिकाणी वेस्ट टू वेल्थ सेंटर्स उभारणी करण्यासमवेतच प्राथमिक कचरा संकलनाकरीता पर्यावरण पुरक बॅटरीवर चालणारी वाहने व चार्जिंग स्टेशनसह अत्याधुनिक पाकींग व्यवस्था उभारली गेेली आहे. तर कचरामुक्त रस्ता संकल्पने अंतर्गत शहरातील एकूण रस्त्यापैकी ३० टक्के रस्ते कचरामुक्त राहणेकरीता स्वतंत्र यंत्रणा, मृत जनावरांचे अवशेष व हरीत कचरा, घरगुती घातक कचरा संकलनाकरीता स्वतंत्र यंत्रणा, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची देखभाल व दुरुस्ती करीता अत्याधुनिक सोयीसुविधांसह ऑटो वर्कशॉप, चाळ परिसर व रस्त्यालगत कचरा उचलण्यासाठी सिटी हुक लोडर यंत्रणा ( कचरा उचलणारी अत्याधुनिक वाहने ) आहे. अशा यंत्रणेच्या माध्यमातून शहरात कचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. =================================== 
आजच्या कार्यक्रमात कचरा संकलन ,वाहतूक आणि रस्ते स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ, परिवहन उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेश वाटप , रिंग रोड मधील बाधित लाभार्थ्यांना पुनर्वसन धोरणानुसार सदनिकांचे वितरण,MUTP प्रकल्पातील बाधितांना चाव्यांचे वितरण, टिटवाळा पूर्व येथील जागेवर उभारलेल्या सौर ऊर्जेवर आधारित उद्यानाचे ऑनलाईन लोकार्पण, खंबालपाडा क्रिडा संकुलाचे ऑनलाइन भूमिपूजन, परिमंडळ तीन मधील दामिनी पथकासाठी वाहनांचे हस्तांतरण इ कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमा अखेरीस उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता उपक्रमाच्या वाहनांना ध्वजांकन केले.
या समयी परिवहन मंत्री मा. ना. प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, सुलभाताई गायकवाड, राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, परिमंडळ- 3 पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, इतर पदाधिकारी, माजी पालिका सदस्य महापालिका अधिकारी ,मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
.jpg)













Post a Comment
0 Comments