ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली १/अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील यांनी टिटवाळा ,कल्याण वळण मार्ग येथील काळू नदीशेजारील 2 रुमचे बांधकाम व 10 फाऊडेंशनवर निष्कासनाची कारवाई आज केली. सदर कारवाई महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि 1 जेसीबी व 10 मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
त्याचप्रमाणे ३/क प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात यांनी कल्याण (पश्चिम) पाठारे नर्सरी, डॉ.आंबेडकर रोड येथील बांधकामधारक तनजीप कांबळे चालू असलेल्या एकुण 10 रुमच्या लोडबेरींग बांधकामावर* निष्कासनाची कारवाई केली. सदर कारवाई बाजारपेठ पोलीस स्थानकामधील पोलीस अधिकारी/ कर्मचारी, महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि 1 जेसीबी च्या सहाय्याने करण्यात आली.
.jpg)

Post a Comment
0 Comments