Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण डोंबिवलीला पुर्ण कार्यकाळासाठी आयुक्त कधीतरी मिळणार आहे का? मनसे नेते राजू पाटील यांचा सवाल


केडीएमसी आयुक्त डॅा. इंदु राणी जाखड यांची १५ महिन्यांमध्येच पालघर जिल्हाधिकारी म्हणून बदली

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण डोंबिवली महानगरपालिका  आयुक्त डॅा. इंदु राणी जाखड यांची १५ महिन्यांमध्येच पालघर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. यावरूनच आता मनसे नेते राजू पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे. 
 राजू पाटील यांनी एक्स पोस्ट द्वारे सांगितले की आयुक्त चांगल काम करत होत्या. आता कुठेतरी अनधिकृत बांधकामांवर अंकुश येत असताना, त्या अनधिकृत बांधकामांच्या नावाने सत्ताधाऱ्यांच्या हस्तकांकडून होतं असलेल्या वसूलीच्या आड त्या येत होत्या का ? आमच्या या शहरांना पुर्ण कार्यकाळासाठी ( ३ वर्ष ) आयुक्त कधीतरी मिळणार आहे का? असा सवाल पाटील यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments