Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

२८ एप्रिल रोजी कल्याणात भव्य पाककला स्पर्धा..महिलांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.

 

२८ एप्रिल रोजी कल्याणात भव्य पाककला स्पर्धा आणि सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट पौर्णिमा शेकोकार यांचे ब्यूटी पार्लरकडून महिलांची फसवणूक ह्या विषयावर व्याख्यान

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर

येथील आपलं प्रतिष्ठान ह्या संघटनेच्या विद्यमाने सोमवार २८ एप्रिल रोजी स्वतंत्र महिलांसाठी तसेच महिला मंडळ आणि महिला बचत गटांसाठी निःशुल्क पाककला स्पर्धा , ब्यूटी पार्लर कडून होणारी फसवणूक ह्या विषयावर व्याख्यान आणि महिलांना नोकरी मिळवून देण्यासाठी नोंदणी अभियान असे कार्यक्रम राबवण्यात येणार असून महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी केले आहे .

   कल्याण पश्चिम येथील महापालिके समोरील स्वामी नारायण हॉल येथे सकाळी ९ ते ४ या वेळेत सदर कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन पालिकेच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर , मुलाखत घेण्याबाबत विश्व विक्रम रचलेल्या रचना बागवे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट पौर्णिमा शेकोकार यांचे ब्यूटीपार्लर कडून महिलांची फसवणूक ह्या विषयावर दुपारी ३ वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले असून महिलांना नोकरी देण्यासाठी नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. पाककला स्पर्धसाठी पूर्व नोंदणी असणे आवश्यक असून नियमांच्या अधिक माहिती साठी अनिल काकडे ९३२४५५२९६३/८१०४२११८१८ ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments